Home नाशिक हरणबारी घाटात संरक्षक भिंत नसल्याने प्रवास धोक्याचा.

हरणबारी घाटात संरक्षक भिंत नसल्याने प्रवास धोक्याचा.

55
0

आशाताई बच्छाव

IMG-20220624-WA0037.jpg

हरणबारी घाटात संरक्षक भिंत नसल्याने प्रवास धोक्याचा.

युवा मराठा न्यूज नेटवर्क

संदीप गांगुर्डे पिंगळवाडे

महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा व मूल्हेर परिसरातील आदिवासी बांधवांचा मुख्य रस्ता म्हणून संबोधला जाणारा ताहराबाद ते आहवा या रस्त्या दरम्यान हरणबारी धरणाचा जवळ हरणबारी घाट आहे. साधारण हा घाट एक किलोमीटरचा आहे. या घाटात काही ठिकाणी मोडकळीस आलेले संरक्षण भिंत आहे. परंतु हरणबारी गावाकडे येत असताना कुठल्याही प्रकारचे संरक्षण बॅरिकेट्स किंवा संरक्षण भिंत आढळून येत नाही. या घाटात तीव्र उतार असल्यामुळे मोठ्या वाहनधारकांना आपला प्रवास जिक्रीचा ठरत आहे. या रस्त्याचा मुख्यत वापर साल्हेर किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांना कडून केला जातो. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित विभागाने ठिक ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स किंवा पूर्णपणे संरक्षण भिंत दिली तर भविष्यात कुठली अघटित घटना होणार नाही. काही ठिकाणी लोखंडी बॅरिकेटस आहेत. परंतु ते पूर्णपणे मोडकळीस आले आहेत.तसेच रस्त्यावर खड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष देण्याची फार गरजेचे आहे……

Previous articleशेवडी येथील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक
Next articleवरवट बकाल येथे राज्य पुरस्कृत सोयाबीन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here