आशाताई बच्छाव
वरवट बकाल येथे राज्य पुरस्कृत सोयाबीन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
संग्रामपुर:- राज्यपुरुस्कृत सोयाबीन प्रकल्पाअंतर्गत प्रक्षेत्रावर बि बी एफ पेरणी मार्गदर्शनआज मौजे वरवट बकाल येथील शेतकर्यांना सोयाबीन पेरणी विषयी के व्ही के जळगाव जामोद चे शास्त्रज्ञ श्री तलोकर साहेबांनी सोयाबीन लागवडीच्या अष्टासूत्रापैकी शेतकर्यांना बी बी एफ यंत्र सोयाबीन पेरणीचे प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी शेतकर्यांना बी बी एफ पेरणी यंत्रा बद्दल असलेल्या शंकांचे निसरण करण्यात आले तसेस तालुका कृषि अधिकारी ए.जी. बनसोडे यांनी बियाणे उगवण क्षमता तपासणी आणि बिजप्रक्रिया या विषयी माहिती देऊन ते कार्यपध्द्त करूनच पेरणी करण्याचे आव्हान शेतकर्यांना केले या वेळी उपस्थित शेतकर्यांनी बी बी एफ पेरणी करण्याविषयी मान्ये केले व बी बी एफ पेरणी साठी आपले नाव नोंदणी केले या वेळी उपस्थित शेतकर्यांनी या बाबीसाठी चांगला प्रतिसाद दिला तसेस यावेळी शेतकर्यांनी विजेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी दामिनी अँप चा वापर करावा या विषयी रवी जाधव कृषि सहायक यांनी माहिती दिली. या वेळी मंडळ कृषि अधिकारी एस.आर.अवचार कृषि मित्र किशोर रौंदळे, सतीश टाकळकर, प्रल्हाद अस्वार, नंदकिशोर रेखाते, उदध्व ढगे, गोपाल टाकळकर, प्रदीप डाबरे, संतोष घायल व नागेश्वर महाराज सेंद्रिय शेतकरी गटातील आदि शेतकरी उपस्थित होते.






