Home परभणी शेवडी येथील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक

शेवडी येथील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220624-WA0033.jpg

शेवडी येथील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक

ब्यूरो चिफ:-शत्रुघ्न काकडे पाटील (युवा मराठा न्युज नेटवर्क)

जिंतूर (परभणी):-तालुक्यातील शेवडी येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करून पैसे न देताच खरेदीदार व्यापाऱ्याने पोबारा केल्याचा प्रकार दीड वर्षापूर्वी घडला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून चार संशयित आरोपींच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर यातील मुख्य संशयित आरोपी दोन दिवसांपूर्वी पुणे येथे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
त्यास गुरुवारी (ता. २३) येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील अनेक वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. थोडेफार हाती आलेल्या शेतमालावर काही व्यापाऱ्यांनी डल्ला मारला. असाच प्रकार येलदरी येथील व्यापारी अमोल एकसिंगे यांनी डिसेंबर २०२० मध्ये शेवडी येथील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन लाखो रुपयांचे सोयाबीन खरेदी केले होते. परंतु, खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे न देताच पोबारा केला, त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन सदरील व्यापाऱ्यांच्या विरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. मात्र,
तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी गुन्हा दाखल केला नव्हता. दरम्यान, शेवडी येथील बालाजी आश्रोबा घुगे यांच्या फिर्यादीवरून अमोल अप्पा एकसिंगे, बाळू अप्पा एकसिंगे, विलास राठोड, विनोद वाव्हळे यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी फरार झाले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी इतर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.

Previous articleशिवसेनेत बंडखोरीचे मुळ शिवसेना भवनच…? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचे बंडखोर नेत्यांना भावनिक आवाहन..?
Next articleहरणबारी घाटात संरक्षक भिंत नसल्याने प्रवास धोक्याचा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here