Home विदर्भ पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोविड लसीकरण जनजागृतीपर गिताचे विमोचन महत्त्वाचे संदेश मनोरंजक...

पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोविड लसीकरण जनजागृतीपर गिताचे विमोचन महत्त्वाचे संदेश मनोरंजक पद्धतीने देणे स्तुत्य- जिल्हाधिकारी निमा अरोरा

111
0

राजेंद्र पाटील राऊत

पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोविड लसीकरण जनजागृतीपर गिताचे विमोचन

महत्त्वाचे संदेश मनोरंजक पद्धतीने देणे स्तुत्य- जिल्हाधिकारी निमा अरोरा

अकोला(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : गितासारख्या मनोरंजक पद्धतीतून महत्त्वाचे जनजागृतीपर संदेश देण्याचा प्रयत्न हा स्तुत्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे केले.

कोविड लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी तयार केलेल्या गीताचे विमोचन आज जिल्हा प्रशासनातर्फे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन भवनातील छत्रपती सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. एस. काळे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाडवे, सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिर साहेब, सिद्धार्थ शर्मा तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमापूजन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गीताचे विमोचन करण्यात आले. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, गिताच्या माध्यमातून लोकांना कोविड लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे तसेच मनोरंजनाच्या माध्यमातून असे महत्त्वाचे संदेश प्रसारित करणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत जनजागृती होण्यात मदत होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी ही आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. सिद्धार्थ शर्मा व शौकत अली मिरसाहेब यांनीही पत्रकार दिनानिमित्त आयोजित उपक्रमाचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी पत्रकार दिनाची पार्श्वभुमि सांगून प्रशासन व पत्रकारांमधील सौहार्दपूर्ण संबंध सकारात्मक वातावरण निर्मितीस कारणीभूत ठरत असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी गीताचे व्हिडीओ सादरीकरण करुन प्रत्यक्ष नृत्यही सादर करण्यात आले. तसेच गीतकार मुकुंद नितोने, नृत्यदिग्दर्शक रहिम शेख, मोहसिन शेख, तंत्रज्ञ विश्वास साठे, गायिका निता खडसे, गायक संजय खडसे,सुगत वाघमारे यांना तसेच नृत्य कलावंत व अन्य तंत्रज्ञांना सन्मानित करण्यात आले.आभार प्रदर्शन डॉ. निलेश अपार यांनी केले तर गजानन महल्ले व निशा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला पत्रकार, तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Previous articleशामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
Next articleगडचिरोली प्रेस क्लब च्या वतीने पञकार दिना निमित्त गौरव पुरस्कार।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here