Home गडचिरोली मौजा पारडी कुपी येथील त्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा वाली कोण? आमदार डॉ...

मौजा पारडी कुपी येथील त्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा वाली कोण? आमदार डॉ देवरावजी होळी यांचा प्रशासनाला सवाल

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220606-WA0054.jpg

मौजा पारडी कुपी येथील त्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा वाली कोण?

आमदार डॉ देवरावजी होळी यांचा प्रशासनाला सवाल

२ जून रोजी शेतामध्ये आग लागल्याने ११ शेतकऱ्यांचे ३६ लक्ष रुपयांचे सुबाभूळ , निलगिरी व सागवान जळून नष्ट

प्रशासनाला अर्ज देवूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याबाबत शेतकऱ्यांचे आमदारांना निवेदन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मौजा पारडी कूपी येथील ११ शेतकऱ्यांच्या शेतामधील जवळपास ३६ लक्ष रुपयांची सुबाभूळ ,निलगिरी व सागवनाची झाडे आगीमुळे जळून नष्ट झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्याला मदत मिळावी याकरीता शासन स्तरावर पाठपुरावा, पत्रव्यवहार केला परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची सहायता प्रशासनाकडून मिळालेली नाही त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा वाली कोण असा सवाल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी उपस्थित केला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रशासनाला केली आहे

जळून नष्ट झालेल्या झाडाबाबतचे निवेदन पारडी कुपी येथील शेतकर्‍यांनी आमदार महोदयांना दिले. यावेळी उदय शरद लोंढे, वासुदेव मुकुंदा निकुरे ,नेताजी पाटील लोंढे, रमेशजी राणे, बंडू पाटील झाडे, पाल पाटील, प्रामुख्याने उपस्थित होते.

पारडी कुपी येथील विजय विजय पारटवार यांच्या शेतीमध्ये आंध्रप्रदेश येथील राम किसन मदुगुला (हल्ली मुक्काम कनेरी टोली) यांच्या घरी कापसाची लागवड केलेली होती त्यातील धसकटे दिनांक २ जून रोजी सकाळी ८ वाजता पेटविले व निघून गेले. परंतु ती आग न विझता उदय शरद लोंढे ,अंताराम किसन उरकुडे, वासुदेव मुकुंदा निकुरे, चंदा वासुदेव निकुरे, जीवन झिंगूजी गंडाटे, रवींद्र गंडाटे ,रमेश तुळशीराम राणे, शकुंतला शामराव मूरतेली, आनंदराव मेश्राम ,छायाताई ईश्वर मुळे, रामेश्वर गोपाळा कुंभारे या ११ शेतकऱ्यांच्या ५३ एकर शेतात पसरली त्यामुळे त्याच्या शेतातील ३६ लक्ष रुपये किमतीचे सुबाभूळ निलगिरी सागवण या जातीची झाडे जळून नष्ट झाली.

या घटनेमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून त्यांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. आपल्याला नुकसान भरपाई मिळावी याकरिता त्यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला परंतु अजूनही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य त्यांना मिळालेले नाही. याबाबत प्रशासनाला वारंवार विचारूनही कोणीही सहकार्य करायला तयार नाही त्यामुळे या शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी उपस्थित केला असून या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Previous articleपैशासाठी डॉक्टरांची रुग्ण पत्रकारासोबत असभ्य वागणूक
Next articleस्वर्गवासी डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांना समर्पित मोतीबिंदू व नेत्रचिकित्सा शिबीर संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here