Home बुलढाणा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व सामाजिक पदाधिकाऱ्यांकडून राधिका इंगळेंच्या दुर्घटनाग्रस्त कुटूंबियांचे सांत्वन….बुलढाणा पोलिस...

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व सामाजिक पदाधिकाऱ्यांकडून राधिका इंगळेंच्या दुर्घटनाग्रस्त कुटूंबियांचे सांत्वन….बुलढाणा पोलिस अधीक्षकांना पत्र.

75
0

आशाताई बच्छाव

IMG-20230523-WA0013.jpg

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व सामाजिक पदाधिकाऱ्यांकडून राधिका इंगळेंच्या दुर्घटनाग्रस्त कुटूंबियांचे सांत्वन….बुलढाणा पोलिस अधीक्षकांना पत्र.

अकोला,(सतिश लाहुळकर/शाहनावाज/स्वप्नील देशमुख)-चिखली तालूक्यातील रोहडा येथील मंदिरात क्रूर आणि मनोविकृत वासनांध हत्त्याऱ्याच्या पाशवी अत्त्याचार आणि केलेल्या अमानुष हत्त्येत बळी गेलेल्या ६ वर्षीय बालिका राधिका इंगळे हिच्या कुटूंबियांचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व सामाजिक पदाधिकाऱ्यांनी काल भेट घेतली.

‌बाळापूर तालूक्यातील तामसी येथील विलास इंगळे या अल्पभूधारक शेतकऱ्यांची राधिका मी निरागस मुलगी होती.दि.१२ मे रोजी चिखली तालूक्यातील रोहडा येथील देवीच्या मंदिरात एका नातेवाईकांच्या लग्नसमारंभात ती आई वडिलांसोबत गेली होती. तेथील फुलविक्रेता सदानंद भगवान रोडगे याने पोंग्याचे आमिष दाखवून तिला नदिपलिकडे नेऊन तिच्यावर पाशवी अत्त्याचार केले.ती जीव वाचवण्यासाठी आटोकाट प्रतिकार करीत असतांनाच तिने त्याच्या चेहऱ्यावर आणि हातावर बोखरल्याच्या रागातून या मानसिक विकृताने तिच्यावर आणखी अत्त्याचार करून तिची दगडांनी ठेचून हत्त्या केली होती.दि.१३ मे रोजी तिचे दगडाखाली लपवून ठेवलेल्या प्रेताचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून आरोपीला गजाआड केले होते.

पोटची लहान मुलगी गेल्याच्या या आकस्मिक मानसिक आघाताने हादरलेल्या या कुटूंबियांना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष व अकोला जिल्हा देशमुख समाज मंडळाचे अध्यक्ष संजय एम.देशमुख,( निंबेकर) यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत भेट दिली.यावेळी त्यांचेसोबत लोकस्वातंत्र्यचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व अकोला पाटील समाजाचे सचिव प्रदिपभाऊ खाडे,राष्ट्रीय सचिव राजेन्द्रजी देशमुख,अकोला जिल्हा देशमुख समाज मंडळाचे उपाध्यक्ष के.व्ही.देशमुख,डोंगरगांवकर, कोषाध्यक्ष वसंतराव देशमुख नारखेडकर उपस्थित होते. झालेल्या घटनेबाबत मुलीचे वडील विलास इंगळे व त्यांचे ज्येष्ठ बंधू बबलूभाऊ व गणेश इंगळे आणि गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल इंगळे आणि सोनू इंगळे यांचेशी चर्चा करून इंगळे कूटूंबियांचे सांत्वन केले.

याबाबत बुलढाणा पोलिस अधीक्षकांना पोलिस ठाण्यावर विश्वास व्यक्त करून योग्य त्या सहकार्यासाठी पाठविलेल्या विनंती पत्रांची एक प्रत विलास इंगळे यांना देण्यात आली. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून कायदेशीर मदतीसाठी सहकार्याचे अभिवचन त्यांना यावेळी देण्यात आले.त्याचप्रमाणे खटला अॕड.श्री उज्ज्वल निकम यांचेकडे देण्याची मागणी लोकस्वातंत्र्यकडून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती संजय देशमुख देशमुख यांनी इंगळे कूटूंबियांना दिली.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
वृतसंकलन विभाग-अकोला विदर्भ
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

Previous articleअमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव मार्गावरील लेहगाव इटकी आता जवळ भीषण अपघात; ५ ठार७ जखमी.
Next articleदेवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी योगेश आहेर व उपसभापती पदी अभिमन पवार यांची बिनविरोध
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here