• Home
  • मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना ” बॉम्ब” न उडवून देण्याची धमकी देणारा मुंबईतून अटक

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना ” बॉम्ब” न उडवून देण्याची धमकी देणारा मुंबईतून अटक

⭕मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना
” बॉम्ब” न उडवून देण्याची धमकी देणारा मुंबईतून अटक⭕
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्ब ने उडवून देणार असल्याची धमकी देणारा संदेश पाठविणार्‍यास मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. करमान अमीन खान (वय २५, रा म्हाडा कॉलनी, चुनाभट्टी, मुंबई) असे त्याचे नाव आहे. मुंबई पोलीस दलातील काळा चौकी युनिटने शनिवारी रात्री त्याला ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेशातील लखनौ पोलीस मुख्यालयाच्या सोशल मिडिया हेल्प डेस्कवरील क्रमांकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडविण्यात येणार असल्याचा धमकीचा मेसेज २२ मे रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता पाठविण्यात आला होता. याबाबत लखनौमधील गोमतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

anews Banner

Leave A Comment