⭕मुंबईत विविध क्षेत्रांत ८ लाख नोकऱ्यांची संधी!⭕
मुंबई :(विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई :-मित्रांनो, आपणास माहितीच आहे, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तसेच देशातील सर्वांत मोठे बंदरही मुंबईजवळच आहे. तसेच मुंबई येथील सोने-चांदीचा व्यवसाय हा देशातील सर्वांत मोठ्या व्यवसायांपैकी आहे. देशातील ६५ टक्के व्यवसाय मुंबईत आहे. याच सराफा क्षेत्रात पश्चिम बंगाल, ओरिसा व उत्तर प्रदेशातील लाखो कारागीर कार्यरत आहेत. त्यांचा आकडा जवळपास १० लाखांच्या घरात आहे, आणि या १० लाखांपैकी ८० टक्के कारागीर पगारी आहेत.
उर्वरित कारागीर गरजेनुसार काम करणारे आहेत. तसेच पगारदारांपैकी ७० टक्के अर्थात सुमारे ५.४० लाख कामगार परप्रांतीय आहेत.
हे सर्व आता जवळपास गावी परतले आहेत. त्याजागी आता स्थानिक तरुणांना कामाची संधी आहे. त्यामुळे स्थानिकांनी आता रोजगारासाठी पुढे यावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले होते. तसेच सराफा व्यावसायदेखील लवकरच सुरू होऊ शकतो. निर्जंतुकीकरणाद्वारे दुकाने सुरू करण्यासाठी सराफा सज्ज आहेत. ही दुकाने सुरू झाल्यास रोजगाराची गरज भासणार आहे.
आता कपड्या व्यवसायाबद्दल बघूया, यात मुंबई ही तयार कपड्यांची मोठी बाजारपेठ आहे. जवळपास ८ हजार दुकानांसह यामध्ये ८० हजारांहून अधिक रोजगार गुंतला आहे. त्यात ८० टक्के कर्मचारी बाहेरील आहेत. ते आता गावी गेल्याने येथे सुद्धा स्थानिकांना भरपूर संधी आहे.
