• Home
  • 🛑 कल्याण-डोंबिवलीत Lockdown आणखी शिथिल; सम-विषम नियम रद्द 🛑

🛑 कल्याण-डोंबिवलीत Lockdown आणखी शिथिल; सम-विषम नियम रद्द 🛑

🛑 कल्याण-डोंबिवलीत Lockdown आणखी शिथिल; सम-विषम नियम रद्द 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 19 ऑगस्ट : ⭕ आधी मुंबई, मग ठाण्यापाठोपाठ कल्याण डोंबिवलीतला लॉकडाऊनही आता शिथिल करण्यात आला आहे. सम-विषम तारखांप्रमाणेच दुकानं उघडी ठेवायचा नियम आता बदलणार आहे. सर्व दिवस दुकानं खुली ठेवायला महापालिकेनं परवानगी दिली आहे. तसंच उल्हासनगरच्या व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे. उल्हासनगरमध्येही उद्यापासून दररोज दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जुलै अखेरपर्यंत कल्याण-डोंबिवली परिसरात कडक लॉकडाऊन होता. कारण ठाणे जिल्ह्यातली सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या याच शहरात होती. अजूनही कल्याण-डोंबिवलीतली रुग्णवाढ सर्वाधिक आहे. पण तरीही संसर्गवाढीचा वेग थोडा मंदावला आहे. ऑगस्टमध्ये हळूहळू व्यवहार पूर्ववत व्हायला सुरुवात झाली. त्यात आता लॉकडाऊन आणखी शिथिल करण्यात आला.

सुरुवातीला दुकानं एकाआड एक दिवस उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. सम विषम तारखा लक्षात घेऊन रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं एका दिवशी उघडी ठेवायला मुभा होती. आता मात्र हा नियम रद्द करण्यात आला आहे. रस्त्याच्या दुतर्फा असणारी दुकानं दररोज उघडण्याची मुभा देण्यात आली आहे.

असाच निर्णय उल्हासनगरमध्येही घेण्यात आला आहे. या शहरातही आता दररोज दुकानं खुली राहतील. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. व्यापाऱ्यांची अनेक दिवसांपासून ही मागणी होती. त्यामुळे त्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे.

दरम्यान राज्यात सोमवारी 8,493 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6,04,358 झाली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment