• Home
  • 🛑 नवनीत राणा यांना कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह 🛑

🛑 नवनीत राणा यांना कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह 🛑

🛑 नवनीत राणा यांना कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 19 ऑगस्ट : ⭕ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. नवनीत राणा यांच्या तब्येतीत शनिवारी सुधारणा झाली. त्यांना अतिदक्षता विभागामधून बाहेर हलवले होते. त्यानंतर प्रकृती सुधारल्याने रवी राणा शनिवारी रात्री उशिरास आणि नवनीत राणा यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र आता मुंबई महापालिकेनं नवनीत राणा यांच्यासह रवी राणा यांची कोरोनाची चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने दोघांनाही होम क्वारंटाईन राहण्यास सांगतिले आहे. त्यानंतर त्यांनी मुंबईत होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे.

नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सासू, सासरे, दोन मुले, आमदार राणा यांचा समावेश आहे. ६ ऑगस्टपासून नवनीत राणा व त्यांच्या पतीवर नागपूर वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. नवनीत राणा यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानंतर १३ ऑगस्टला नागपूरहून त्यांना व त्यांच्या पतीला वांद्रेतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले होते.⭕

anews Banner

Leave A Comment