Home मुंबई शिवसेनेत बंडखोरीचे मुळ शिवसेना भवनच…? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचे बंडखोर नेत्यांना भावनिक आवाहन..?

शिवसेनेत बंडखोरीचे मुळ शिवसेना भवनच…? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचे बंडखोर नेत्यांना भावनिक आवाहन..?

32
0

आशाताई बच्छाव

IMG-20220624-WA0036.jpg

शिवसेनेत बंडखोरीचे मुळ शिवसेना भवनच…? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचे बंडखोर नेत्यांना भावनिक आवाहन..?

मुंबई (अंकुश पवार, जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल अँड पेपर)

स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रातील जनतेला राजकारण काही नवीन नाही. ग्रामीण भागात तर गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण म्हटले की घरदार सोडून त्यासाठी लागणारे लोक आपण पाहिली आहेत परंतु त्यावेळी फक्त करमणूक मनोरंजन आणि नेत्याच्या मागे लागून टाइमपास करताना सच्ची आणि प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते ही प्रत्येक पक्षात दिसून येत होते.
परंतु आता गेल्या दहा ते वीस वर्षांपासून राजकारणाचा रंग बदलून गेला आहे हा बदललेला रंग अनेक कार्यकर्ते अनेक लोकांच्या आयुष्याचा भंग करताना ठरत आहे.

आजच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु असलेला विषय म्हणजे महाराष्ट्रातील महा विकास आघाडी सरकार राहणार की जाणार त्यामध्ये सुद्धा नैसर्गिक रित्या मतदारांकडून निवडून आलेले दोन पक्ष भाजप आणि शिवसेना या पक्षांची युती असताना देखील फक्त मुख्यमंत्री कोण या अट्टाहासापोटी सरकार महाराष्ट्र स्थापन करून अडीच वर्ष महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांनी स्थापन केले.
सुरुवातीच्या काळात कडून हे सरकार थोड्या दिवसात पडेल असे वक्तव्य येत होते परंतु हे सरकार अडीच वर्ष सुरळीत चालले राजकारणातले जादूगर म्हणण्यात येणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री पवार साहेब यांच्या जादूगीरी हे सरकार उभे राहिले आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपल्याला मुख्यमंत्री म्हणून लाभले. परंतु आज परिस्थिती आता अशी आहे की हीच शिवसेना जी 80 – 90 च्या दशकात कट्टर शिवसेना आणि महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पक्ष म्हणून नावारूपास आली हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे आक्रमकपणे लडली त्याकाळी शिवसेना हाच लोकांचा सामान्य कार्यकर्त्यांचा श्वास आणि ध्यास बनला होता परंतु आता चित्र काही वेगळे आहे शिवसेनेत फूट पडली आहे.

आता अनेक पक्ष असा दावा करीत आहेत की या मागे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजकारण आहे किंवा खुद्द उद्धव ठाकरे साहेबांचं राजकारण आहे किंवा खरंच शिवसेना फुटले हे तीन वेगवेगळे चर्चेत असलेले विषय आहे सत्यता कोणालाही नक्की माहित नाही कारण राजकारण कोणत्याही क्षणी काही वळण घेऊ शकतो राजकारणात कोणत्याही क्षणी काही होऊ शकतो हे आपण गेल्या साठ वर्षात महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिलेली आहे.
गेल्या काही दिवसांच्या घडामोडी पासून शिवसेनेसारखा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी कशी होऊ शकते असाच प्रश्न सामान्य जनतेला आणि अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला आहे आपण सध्या तरी खरंच शिवसेना फुटलेली आहे नेते शिवसेनेतून वेगळे झालेले आहेत हेच गृहीत धरून पुढील गोष्टीची चर्चा करून आता आपण काही वेगळे बोलण्यापेक्षा विधान परिषद आणि राज्यसभेची निवडणूक झाली त्यावेळी अनेक खासदार आमदार नाराज होतील आणि जसा निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी काही आमदार वेगळे झाले सुरत येथे जाऊन बसले नंतर गुहाटीला गेले नंतर आसामला गेले आणि असं त्यांचं चक्र सुरू राहिले त्यांची मागणी एकच होती की आम्हाला महाविकास आघाडी नको सरकारमधून बाहेर पडा आपले जुने मित्र पक्ष भाजप यांच्यासोबत या आपण त्यांचे 106 निवडून आलेले सदस्य आणि आपले 55 सदस्य असे मिळून आपली जुनी मैत्री कायम ठेवून सरकार स्थापन परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक फेसबुक लाईव्ह घेऊन तडकाफडकी मुख्यमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला परंतु परत चेंडू बंडखोर नेत्यांच्या झोळीत टाकला तुम्ही सांगा तुम्ही म्हणत असाल तर आम्ही राजीनामा देतो तुम्ही स्वतः राज्यपालांकडे घेऊन जा आणि वर्षा बघण्यावरून मुख्यमंत्री मातोश्रीवर गेले असे असताना आता परिस्थिती अशी आहे की नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात होणार काय कारण फक्त शिवसेनेचा विचार केला तर आतल्या मंडळीला रोखण्यासाठी शिवसेना प्रयत्न करीत आहेत परंतु जे बंडखोर नेत्यांमधील एका आमदारांनी सर्व आमदारांच्या भावना लिहून जे पत्र माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे पाठवले त्याच्यावर विचार करण्याची वेळ येऊन उभी राहिली आहे. त्यांच्या मते प्रत्येक वेळी तुझा पाहुनी आपली आपलं सरकार असून लोकांची काम न होणे तसेच अनेक वेळ मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर केबिन बाहेर ताटकळत उभे राहणे इत्यादी मानापमानाच्या गोष्टी घडल्या परंतु खोल विचार केला असता आम्हा सर्वांना किंवा जनतेला फक्त हेच कारण असेल असे वाटत नाही राजकारणाच्या घडामोडी होत असतात मानापमान सत्ता येणे-जाणे होत असतात पण त्यालाही अनेक गोष्टी जबाबदार आहेत असे समोर दिसून येते ते म्हणजे आदित्य ठाकरे यांचा वाढत असलेल्या इतर विभागांमध्ये हस्तक्षेप आणि एमपीएससी परीक्षा गेल्या आठ चार पाच वर्षांपासून झालेल्या नाहीत झाल्या त्या पण पेपर फुटी आणि इतर कोणत्याही कारणामुळे अडकलेले आहेत पोलीस भरती आलेली आहे अनेक मुलांनी जीव दिलेली आहेत परीक्षा होत नाही सरकारी नोकरी नाहीत दोन अडीच लाखाच्या हून अधिक रिक्त पदे असतानादेखील सरकार जागा भरत नाही भरल्या पेपर फुटी होऊन ती परीक्षा रद्द करते हे अनेक दिवसांपासून वर्षापासून होत आहे आणि आदित्य ठाकरे यांच्या वयाची मुलं किंवा त्यांचे सर्वसामान्य कार्यकर्ते असताना शिवसेनेच्या जन्मापासून सोबत असलेले ज्येष्ठ नेते कार्यकर्ते मंडळी सोबत असताना पहिल्या टर्ममध्ये आदित्य ठाकरे यांना आमदारकी आणि लगेच मंत्रिपद देणे माननीय उद्धव ठाकरे यांना किती सोयीचे वाटले हा प्रमुख कारण ही या बंडाळी च्या मागे असण्याचे नाकारता येत नाही.
कारण आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो म्हणजे सर्व आपल्यालाच मिळेल असा भ्रम काही लोकांना झाला असेल तर तो चुकीचा आहे हेच या नाराजीतून समोर आली आहे. कारण याआधी देखील भांडण नाराजगी प्रत्येक पक्षात झालेले आहे. दुसरा मुद्दा पक्षांतर बंदीचा हे नाव दिलेले आमदार यांना पक्षांतर बंदी कायदा नवे नियमित करा असे आत्ताच खासदार संजय राऊत यांनी पत्र राज्यपालांना पाठवलेले आहे परंतु जर 91 घटनादुरुस्तीनुसार 2/3 आमदार जिंकून आलेल्या जावेच्या सोबत पळून आलेले असतील म्हणजे नारळाचं आलेले असतील तर कोणत्याही आमदाराचे निलंबन होऊ शकत नाही असा कायदा सांगतो म्हणजे घटनादुरुस्ती सांगते आता त्यात सुद्धा 2/3 आमदार जर एकूण जिंकलेल्या जागेच्या प्रणित सोबत आले असतील आणि ते अकरा जर कमी किंवा जास्त होत असेल तरीही आमदारकी नष्ट होत असते परंतु इथे चित्र वेगळे आहे इथे आमचा आकडा पूर्ण झालेला आहे असा दावा खुद्द नेते एकनाथजी शिंदे साहेब करत आहेत
त्यामुळे या बंधळा अनेक बाजूंनी नाराजीचे सूर आधीपासून दिसून येत आहेत जे पक्ष कार्य नीला किंवा अंतर्गत पक्षाला कसे काय समजले नाहीत हे नवलच वाटत नाही इतके आहे. आता शरद पवार हे मैदानात उतरले आहेत त्यांनी मुंबईतल्या आणि विधानमंडळात कायदेशीर लढाई लढा असे आव्हानच या बंडखोर नेत्यांनी दिलेले आहे परंतु एकनाथ शिंदे साहेब या सर्व आमदारांचे नेते म्हणून काम करत आहेत त्यांना त्यांनी कोणतेही पक्ष फोडण्याची या बंडखोरी करण्याची प्रयत्न केलेले नाही कारण तेव्हाच होते जेव्हा एखादा पक्ष फुटतो एखादा अंदाज दुसऱ्या पार्टीत जातो किंवा पाठिंबा देतो शिंदे साहेबांच्या गटाच्या म्हणण्यानुसार आम्ही शिवसेना सोडली नाही आम्ही ठाकरे साहेबांचे विचार आनंद दिघे साहेबांचे विचारांना धरून शिवसेना पुढे नेत आहोत फक्त आम्हाला भ्रष्ट लोकांबरोबर काम करण्याची इच्छा नाही एवढेच वक्तव्य आणि इच्छा त्या सर्व त्यांनी व्यक्त केली आहे याला आपण बंद होईल कशी म्हणू शकतो हेच अनेक लोकांना समजून येत नाही. जर हा गट सशक्तपणे भाजपला पाठिंबा देऊन सामील झाला असता तर निलंबन पण सदस्यत्त्व रद्द तर बंद दोरी या गोष्टी आल्या असत्या परंतु आता मला काय मॅजिक आकडा लागेल आणि किती लढाई लढली जाईल ते आपल्यासमोर समजून येईल परंतु धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मनातील लोकांचा लोकनाथ हे एकनाथजी शिंदे साहेब नक्कीच झालेले आहेत त्यांचा विचार बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन तिच्या गटाबरोबर पुढे आलेली आहेत जरी भाजपसोबत येऊन सरकार स्थापन झालं तरीही शिवसेना म्हणूनच हे सगळे गट आमदार शिवसेनेसोबत राहतील असा सर्वांना विश्वास आहे. हे आपण येणाऱ्या बातम्या आणि परिस्थितीला पाहून केलेले वक्तव्य आहे राजकारणासाठी काही होऊ शकतं राजकारण खेळत असा आहे जो कधीही बदलू शकतो कोणत्याही क्षणी बदलू शकतो कारण राजकारण आकड्यांचा खेळ आहे त्यामुळे कोणी कुठेही कोणत्याही पक्षात गेलं ते सर्वसामान्य लोकांना न सोडता त्यांचा विचार करून एक स्थिर सरकार देण्याची जबाबदारी आणि लवकरात लवकर निर्णय घेण्याचे काम हे नवीन येणाऱ्या सरकारने अथवा महाविकासआघाडी टिकली तरच या सरकारने करण्याची गरज या लेखाद्वारे आम्ही सर्व नेतेमंडळींना देऊ इच्छितो. नाराजगी तेव्हाच खूप असते जेव्हा एखादी गोष्ट म्हणून विरुद्ध घडते अशा अनेक गोष्टी घडत असतील शिवसेनेमध्ये इतर पक्षांमध्ये घडत असते परंतु आदित्य ठाकरे यांचं नाव आणि यांचे गाडीचे जे वलय ते वारंवार लोकांसमोर येऊ लागले युवा सेना युवा सेना नंतर लढले निवडणूक लढली आणि त्यांच्याबरोबरचे त्यांच्याच वयाचे आमदार रोहित पवार आमदार अनिल तटकरे आमदार पंकजा मुंडे इत्यादी एकाच वयाचे तरुण आमदार असताना सुद्धा लोकांमधून हे लाखोच्या मतांनी निवडून येऊन आदित्य ठाकरे यांना विशेष प्रेम कसे काय मिळाले म्हणजेच त्यांच्या विरोधात एकही फॉर्म नाही एकही विरोधक नाही अशा परिस्थितीत निवडून येऊन मंत्रिपद भेटणार हे सर्वात मोठी कौतुकाची आणि त्याहून आश्चर्याची बाब ठाकरे सरकार निर्माण झाल्यापासून अनेक विरोधक समर्थक शिवसैनिक आणि अनेक लोकांच्या मनात खतकर असणार असे अनेक लोकांच्या अभिप्रायातून पुढे आलेले आहे आणि तेच आता या नाराजगीतून व्यक्त झालेले आहे. शिवसेना पक्ष हा कधीही न संपणारा आणि कट्टर हिंदुत्ववादी दिशेने चालणारा पक्ष आहे ज्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे संस्कारांचे आणि आशीर्वाद पहिल्यापासून लावलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील हा वाघ कायम असाच सहकारी पडत राहणार आहे परंतु नाराजगी चंद्र सूर्य आणि दिवसापासून या पक्षाला लागला आहे ती सोडवण्यासाठी संजय राऊत आणि परत इत्यादींसारखे लोकांमधील न जाता डायरेक्ट उडून गेले लोक जोपर्यंत पक्षात पुढे पुढे करतील तोपर्यंत सामान्य शिवसैनिक कार्यकर्ता कोणत्याही छोटा छोटा करणारे नाराज होत राहील असा ग्राउंडवर पाहण्यात आलेला आहे कारण शेवटी लोकांपुढे निवडून आलेले आमदार खासदार यांना काळजी करावी लागते असा स्पष्ट उल्लेख आमदारांच्या पत्रात केलेला दिसून येतो. 2016साली राज ठाकरे साहेब यांनी शिवसेना सोडली तेव्हा ही हाच मुद्दा समोर आला होता परंतु वेळा पक्ष काढल्यामुळे ठाकरे साहेबांचे वेगळे मत वेगळा पक्ष वेगळे नियोजन तयार झाले होते परंतु आता शिंदे साहेबांचे नावाचे मुळे नावे या पक्षाचे नावे विजय विचारे हिंदुत्वाचा आणि शिवसेना पुढे नेण्याचा परंतु अशा काही लोकांच्या विरोधात जाऊन जे शिवसेनेला विनाकारण बदनाम करत आहेत आणि आत मध्ये राहूनच पक्षासाठी काम न करता इतर पक्षांच्या मदतीसाठी काम करत आहेत हाच मुद्दा घेऊन एवढे चाळीस ते पन्नास आमदार नाराज होऊन बसले आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचे सामर्थ्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नक्कीच आहे परंतु सध्या परिस्थिती बिकट आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आता त्यांच्या मदतीला आहेतच येत्या काही काळात काय होते भाजप किती सहकार्य करते ती भाजपच आकड्यांचा खेळ करून संस्था स्थापन करते हे पाहणे योग्य गोष्ट पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे.

Previous articleकाळाने केला घात, विज पडुन दोघांचा मृत्यु तर 2 जखमी
Next articleशेवडी येथील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here