Home रत्नागिरी शिरगाव-उद्यमनगरात कचर्‍याच्या दुर्गंधीचे साम्राज्य

शिरगाव-उद्यमनगरात कचर्‍याच्या दुर्गंधीचे साम्राज्य

75
0

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0034.jpg

शिरगाव-उद्यमनगरात कचर्‍याच्या दुर्गंधीचे साम्राज्य

रत्नागिरी,(सुनील धावडे) :शहराला लागून असलेल्या शिरगाव ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असलेल्या चंपक मैदान नजिकच्या भागात सध्या कचर्‍याच्या दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरातून ये-जा करणारे नागरिक तसेच गणपतीपुळेसह मिर्‍या, आरे-वारे समुद्र किनारी जाणार्‍या पर्यटकांना प्रचंड दुर्गंधीतून प्रवास करावा लागत आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासन नेमके या परिसराकडे कोणत्या कारणाने दुर्लक्ष करीत आहे? असा सवाल सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.

शिरगाव ग्रामपंचायत ही रत्नागिरी जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून गणली जाते. मागील दीड वर्षापासून या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक आहे. तरी या भागातील प्रशासकीय कामे वेळेमध्ये होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र उद्यमनगर येथील चंपक मैदानासमोरील रस्त्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप दिसून येत असल्याने ग्रामस्थांसह पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सदरच्या भागामध्ये कचरा उचलणारी गाडी येते की नाही? असा प्रश्नही या भागातून ये-जा करणार्‍या पादचारी, पर्यटक वाहनधारकांना पडत आहे. या रस्त्यावरून जाता-येता असे दिसून येते की, औद्योगिक वसाहतीच्या बाहेर निम्म्याहून जास्त रस्ता हा कचर्‍याने भरून गेला असल्याचे दिसत आहे. कोरोनाचे प्रमाण काहीअंशी कमी होत असतानाच इतर साथीच्या रोगांनी डोके वर काढले असताना शिरगाव ग्रामपंचायतीचे प्रशासन असे ढिम्मपणे का वागत आहे? अशीही विचारणा ग्रामस्थांमध्ये होत आहे. या भागात श्वसनाचे विकार, मलेरिया, डेंग्युसारखी रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या या भागामध्ये ग्रामपंचायत सदस्य नसल्यामुळे या भागाकडे दुर्लक्ष केले जात आहे का? असे असले तरी आगामी काळात सदर वॉर्डमधून इच्छुक निवडणूक उमेदवार हे नेमके कोणत्या संधीची वाट पहात आहेत. निवडणूक आली की बाशिंग बांधून उभे असलेले उमेदवार नेमके आता कुठे गायब झाले आहेत? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

Previous articleछावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेला खंडाळा अर्बन मध्ये श्रींच्या आरतीचा मान
Next articleभाजपा अल्पसंख्यांक मोर्चा रत्नागिरी शहराध्यक्षपदी रफिक मुकादम यांची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here