Home रत्नागिरी पैसा फंडचे बालकलाकार रमले बालचित्रकला स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांचा सहभाग; विविध विषयांवर रेखाटली...

पैसा फंडचे बालकलाकार रमले बालचित्रकला स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांचा सहभाग; विविध विषयांवर रेखाटली चित्रे

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0046.jpg

पैसा फंडचे बालकलाकार रमले बालचित्रकला स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांचा सहभाग; विविध विषयांवर रेखाटली चित्रे                                                                  रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

शिक्षण विभागातर्फे दरवर्षी घेतली जाणारी राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धा यावर्षी १२ ऑगस्ट रोजी राज्यभर आयोजित करण्यात आली होती. व्यापारी पैसा फंड संस्थेचे पैसा फंड इंग्लिश स्कूल दरवर्षी या स्पर्धेत उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवते. यावर्षी प्रशालेतील एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

बालचित्रकला स्पर्धेचे महत्व प्रशालेच्या कला विभागातर्फे विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्यानंतर ४० विद्यार्थी उत्सफुर्तपणे या स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेत तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येतात. या स्पर्धेसाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी असणारी पाच रुपये प्रवेश फी विद्यार्थ्यांकडून न घेता प्रशालेच्या कला विभागातर्फे भरण्यात आली. चित्र काढण्यासाठी दोन तासांचा वेळ देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या आकलनानुसार विषयाची निवड करुन उत्कृष्ट कलाकृती रेखाटून बाल चित्रकला स्पर्धेचा खराखुरा आनंद लुटला. स्पर्धेसाठी दिलेल्या विषयाचे चित्र आधी आपल्या मनात तयार करुन नंतर ते कागदावर रेखाटून रंगवताना पैसा फंडचे बालकलाकार आपले देहभान विसरुन गेले.

पैसा फंडच्या कला विभागातर्फे कला विषयक विविध उपक्रम राबविले जातात. सध्या शासकीय रेखाकला परीक्षेचे जादा तास, हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत होणाऱ्या विविध स्पर्धा, स्वातंत्र्य दिनाची पूर्व तयारी अशा सर्व उपक्रमातून प्रशालेतील ४० विद्यार्थ्यांनी बालचित्रकला स्पर्धेसाठी आपला उत्सफुर्त सहभाग नोंदवल्याबद्दल व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी या बालकरांचे कौतूक आणि अभिनंदन केले आहे.

Previous articleन्यू.व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु.येथे रक्षाबंधन साजरा बहीण भावाचे नाते बंधनात बांधले
Next articleचांदवडच्या कळमदरेत ग्रामसभा उत्साहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here