Home उतर महाराष्ट्र ट्रक मालकाचा विश्वासघात करून ड्रायव्हर व क्लिनर यांनी संगनमताने पळवलेला ट्रक सोनई...

ट्रक मालकाचा विश्वासघात करून ड्रायव्हर व क्लिनर यांनी संगनमताने पळवलेला ट्रक सोनई पोलिसांकडून मुद्देमालासह जप्त..

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20230702-WA0031.jpg

ट्रक मालकाचा विश्वासघात करून ड्रायव्हर व क्लिनर यांनी संगनमताने पळवलेला ट्रक सोनई पोलिसांकडून मुद्देमालासह जप्त..

कारभारी गव्हाणे सोनई ( वार्ताहर) — दि. १० जुन रोजी जवळाअर्जुन ता. पुरंदर येथील शरद सुधाकर टेकावडे यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. यशवंत नगर सोनई येथील ड्रायव्हर अर्जुन सोमनाथ सोनवणे व क्लिनर नवनाथ साळवे रायपूर राज्य छत्तीसगढ येथुन ट्रक मध्ये ३० टन लोखंडी पाईप भरून ते पुणे येथे खाली करण्यासाठी दिले होते. अशी फिर्याद सोनई पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गु. र. नं. २५८/२०२३ भा. द. वि. कलम ४२०,४०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या नुसार सोनई पोलीसांनी जलद गतीने तपास करुन गुन्ह्यात चोरीला गेलेले पाईप हे वाजुंळीशिवारात विक्री केली असल्याची माहिती मिळाली. आरोपी सतिष शिवाजी खंडागळे रा. वांजोळी ता. नेवासा यास अटक करून त्याच्याकडून सुमारे ३८ हजार रुपये किंमतीचे लोखंडी पाईप जप्त केले. उर्वरित पाईप हे नितीन विलास शिरसाठ रा. लोहगाव याच्या मार्फत राजेंद्र मुंदडा रा. लासुर स्टेशन ता. गंगापूर जि. संभाजीनगर यास २३टन ९६० किलो वजनाचे पाईप विक्री केले असल्याची माहिती दिली त्यानुसार १४ लाख ३८ हजार रुपये किंमतीचे लोखंडी पाईप जप्त केले आहे. सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला , मा. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर श्रीरामपूर, तसेच सुनील पाटील मा. उप विभागीय अधिकारी शेवगाव , यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पो. स. ई. राजु थोरात, पो. हे. काॅ. एम . आर. अडकित्ते , पो. हे. काॅ. दत्ता गावडे, पो. काॅ. विठ्ठल थोरात, पो. काॅ. निखिल तमनर , पो. काॅ. महेंद्र पवार यांनी केली

Previous articleप्रेरणादायी शिक्षण देणारे शिक्षक,आई वडील हेच विद्यार्थ्यांचे खरे आदर्श गुरुवर्य होय
Next articleसंत नामदेवांच्या संत मेळाव्यातील वारकरी संत- संत चोखामेळा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here