Home नांदेड गुलाब घोडके यांनी शिक्षण क्षेत्रात मनोभावाने ३१ वर्ष सेवा केली — माजी...

गुलाब घोडके यांनी शिक्षण क्षेत्रात मनोभावाने ३१ वर्ष सेवा केली — माजी आ. रोहिदास चव्हाण

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0024.jpg

गुलाब घोडके यांनी शिक्षण क्षेत्रात मनोभावाने ३१ वर्ष सेवा केली — माजी आ. रोहिदास चव्हाण

लोहा / प्रतिनिधी
अंबादास पाटिल पवार

गुलाब घोडके यांनी शिक्षण क्षेत्रात मनोभावाने ३१ वर्ष सेवा केली असे प्रतिपादन माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी लोहा येथे व्यंकटेश गार्डन मध्ये जिल्हा परिषद केन्द्रीय प्राथमिक शाळेचे सहशिक्षक गुलाब महमंदसाब घोडके यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळा कार्यक्रमात केले.
दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे सहशिक्षक गुलाब महमंदसाब घोडके यांनी शिक्षण क्षेत्रात ३१ वर्ष सेवा बजावून ते दि.३०-९-२०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा लोहा येथील व्यंकटेश गार्डन येथे सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे एका शानदार कार्यक्रमाद्वारे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रोहिदास चव्हाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोहन अण्णा हंबर्डे, नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे,गुटे, मेसटाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शिंदे, माजी नगरसेवक बाबुभाई कुरेशी, नगरसेवक भास्करराव पाटील पवार, नगरसेवक पंचशील कांबळे, नबीसाब शेख,बनवसचे सरपंच चंद्रशेखर लांडगे, माजी नगरसेवक पंकज परिहार,शेरफोदीन शेख , शिक्षक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठूभाऊ चव्हाण, बाबुराव फसमले,अमिन पठाण, मदन नायके , कृ..भा. जाधव,सचिन आढाव, रमेश पवार, शेख मुरतुजा, संजय जाधव, रवि वाघमारे, मंगल सोनकांबळे, कसबे सर, बी.डी.जाधव, बाळासाहेब पाटील कळकेकर , यांच्यासह गुलाब घोडके सर यांचे कुटुंबीय , नातेवाईक, मित्रमंडळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गुलाब घोडके सर यांचा शाल पुष्पहार ,खारिब खोबऱ्याचा हार ,कपडेरुपी जोडआहेर करून भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना गुलाब घोडके सर म्हणाले की, आपण एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमाला आलात यामुळे माझे अंतःकरण भरुन आले इतके दिवस मी शिक्षण क्षेत्रात सेवा केली येथून पुढची सेवा माझी समाजाची राहिल हे मी जाहिर करतो व शिक्षण क्षेत्रात कुणाला मार्गदर्शन लागत असेल तर मी सदैव तत्पर आहे असे गुलाब घोडके सर म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख सर यांनी केले तर सुत्रसंचलन विक्रम कदम यांनी केले व आभार बी.डी. जाधव यांनी मानले.

Previous articleसोनई महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धा संपन्न…     
Next articleसेवानिवृत्त पोलिसाच्या मुलगा, तसेच व्यावसायिक. विजय वसंत ढुमे. यांची सिंहगड रोड वर सपासप वार करून खून….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here