Home उतर महाराष्ट्र सोनई महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धा संपन्न…     

सोनई महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धा संपन्न…     

97
0

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0022.jpg

सोनई महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धा संपन्न…                                     नेवासा,( कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहमदनगर क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सन्माननीय उदयन दादा गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आंतर महाविद्यालयीन खो-खो (मुली) स्पर्धा दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून २० संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांचा खेळातूनच सर्वांगीण विकास होतो तसेच आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य विकास करण्याचा मार्ग हा खेळ आहे, असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर मुळा एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ.विनायक देशमुख सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही खऱ्या अर्थाने खेळातून होते असे मत व्यक्त केले. सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे आणि नेवासा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे सर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील क्रीडा विभागाच्या वतीने क्रीडा समन्वयक डॉ. आरक वंदना यांच्या नियोजनाखाली आयोजित या स्पर्धेत कोपरगाव, राहुरी, शेवगाव, लोणी,नगर शहर, श्रीगोंदा,श्रीरामपूर इत्यादी महाविद्यालयातून संघ सहभागी झाले. याप्रसंगी अहमदनगर क्रीडा विभागाचे सचिव डॉ. देवकाते राजेंद्रकुमार, सहसचिव डॉ.प्रमोद विखे, क्रीडा संचालक डॉ. शांताराम साळवे, डॉ. विजय म्हस्के, डॉ. शरद मगर, प्रा. नितीन वाळुंज, प्रा. चोरमले सतिश, प्रा. धोपावकर हे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ. वंदना आरक, प्रा. तूवर पाटील, डॉ. रवींद्र खंदारे, श्री चक्रनारायण भाऊसाहेब, श्री सोनवणे दिपक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सेवक यांनी प्रयत्न केले.

Previous articleटोम्पे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न
Next articleगुलाब घोडके यांनी शिक्षण क्षेत्रात मनोभावाने ३१ वर्ष सेवा केली — माजी आ. रोहिदास चव्हाण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here