Home अमरावती टोम्पे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

टोम्पे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

147

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0023.jpg

टोम्पे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न
मयुर खापरे चांदुर बाजार

चांदूरबाजार येथील गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गणेश उत्सवाच्या निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.भास्करदादा टोम्पे,अमरावती रक्तदान समितीचे अध्यक्ष मा.महेंद्रजी भुतडा, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, डॉ. नंदकिशोर गव्हाळे, पीडीएमसी, अमरावती येथील डॉ. अक्षय जोशी, डॉ. अक्षदा वैरागडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असे म्हणून सर्व रक्तदात्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले तर संस्थेचे अध्यक्ष भास्करदादा टोम्पे यांनी मानवी जीवन जसे अनमोल आहे तसे रक्तदान सुद्धा अनमोल असून त्यामुळे कोणाचे तरी प्राण वाचते असे म्हणून रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. या रक्तदान शिबिरात डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, अमरावती येथील वंदना चौधरी, हरीसखान, स्वाती चुडे, परशुराम पवार, सुरज नागपुरे, अभिषेक पाटील, रुचिता जुमडे, मोहिनी पहाडे, मोहित ढोले, साक्षी भोजने, प्रणाली भुसारी, राशी गुल्हाने आणि अमोल तेटू ही डॉक्टर चमू उपस्थित राहून रक्तदान शिबिर यशस्वी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लालबा दुमटकर यांनी केले तर आभार डॉ. श्रीकृष्ण उबरहंडे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, परिसरातील सामाजिक संघटना उपस्थित राहून रक्तदान केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. युगंधरा गुल्हाने व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous articleकै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय चांदूरबाजार येथे राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा
Next articleसोनई महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धा संपन्न…     
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.