Home अमरावती कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय चांदूरबाजार येथे राष्ट्रीय सेवा...

कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय चांदूरबाजार येथे राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0020.jpg

कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय चांदूरबाजार येथे राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा.    मयुर खापरे चादुंर बाजार     
स्थानिक कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय चांदूरबाजार. येथे राष्ट्रीय सेवा योजना दिवस 25 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.व्हि. डि. चोरे अध्यक्ष तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. प्रफुल राऊत उपस्थित होते प्रा.डॉ. विनय वसुले यांनी NSS अभियानाचे उद्देश व आवश्यकता सांगितली. डॉ. प्रफुल राऊत यांनी विद्यार्थी जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद केले. NSS मुळे विद्यार्थी कसे घडतात यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. व्ही. डी. चोरे मॅडम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेबाबत जागरूकता तसेच विद्यार्थ्यांना एनएसएस अभियानाचे उद्देश व आवश्यकता तसेच समाजाप्रती असलेले कर्तव्य या विषयी विद्यार्थ्यांना जागृत केले. भारत हा युवकांचा देश आहे या योजनेच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठा व देशांचा चांगला नागरिक आपल्या युवकांमधून निर्माण व्हावा हा उद्देश ठेवावा असे प्रास्ताविकातून डॉ. मीना वैद्य महिला कार्यक्रम अधिकारी यांनी विशद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनिल वैद्य एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी गायकवाड हिने केले या कार्यक्रमांमध्ये प्रा. डॉ. चवरे, प्रा. रेहान सर, डॉ. सहारे सर व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच एन.एस.एस स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमाला B.A व B.C A विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleसमृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग; प्रसंगावधनातेमुळे चालकासह 32 प्रवासी बचावले.
Next articleटोम्पे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here