• Home
  • दोनशे युनिट पर्यंत विज बिल माफ करावे

दोनशे युनिट पर्यंत विज बिल माफ करावे

*दोनशे युनिट पर्यंत विज बिल माफ करावे

हातकणंगले तालुक्याचे विद्यमान आमदार मा.राजूबाबा आवळे यांनी आज दिनांक 24-05-20रोजी
महाराष्ट्राचे महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आमदार राजूबाबा आवळे यांनी हातकणंगले मतदारसंघातील विविध प्रश्न मांडले. यावेळी २०० युनिट पर्यंतचे वीज बिल माफ करावे. सर्व नागरिकांना रेशन दुकानांमधून गहू , तांदळासोबत डाळी व खाद्यतेल उपलब्ध करावे. आशावर्कर, अंगणवाडी सेविका यांना पीपीई कीट द्यावे. तसेच त्यांच्या मानधनात वाढ करावी. बारा बलुतेदार समाजांना आर्थिक मदत करावी.आदी मागण्या आमदार राजू बाबा आवळे यांनी मा.मंत्री थोरात साहेब यांच्याकडे केल्या आहेत….

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ*
*युवा मराठा न्यूज .कोल्हापूर*

anews Banner

Leave A Comment