• Home
  • लाॅकडाॅऊन काळात विना परवाना बांधकाम सुरू

लाॅकडाॅऊन काळात विना परवाना बांधकाम सुरू

 

*लाॅकडाॅऊन काळात विना परवाना बांधकाम सुरू.*
हातकणंगले तालुका पेठ वडगांव मधे कोल्हापूर रोड वरती शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी चे हनुमान मंदिर आहे.
सदर मंदिरामध्ये पुर्वी लहान मुलांची शाळा होती.
नंतर काही कारणांनी शाळा दुसरीकडे स्थलांतरित झाली. काही राजकारणी नेत्यांच्या वरदहस्ता ने तेथे शाळेच्या खोल्या पाडून तेथे दुकान गाळे ऊभाकेले. वडगांव नगर पालिकाने सदर गाळे भाडे तत्वावर देऊ केले.
सदरच्या दूकानामुळे भाविकांना व रहदारीला अडथळा निर्माण होऊ लागला.
सद्ध्या हि दुकाने बरेच वर्ष बंद अवस्थेत आहेत. आणि सद्ध्या देशभरात लाॅकडाॅऊन सुरू असलेने याचा फायदा घेऊन वडगांव शहरामध्ये हनुमान मंदिराच्या दारात विना परवानगी बांधकाम सुरू आहे. सदरचे बांधकाम पूर्वीच्या बांधकामापेक्षा त्याची लांबी,रूंदी, उंची वाढवून बांधकाम सुरू आहे.
मंदिरातून बाहेर आल्यानंतर जेष्ठ नागरीक व माताभगिनी यांना बसनेसाठी कट्टा होता तोही गायब करून त्यावरही अतिक्रमण केले आहे. मंदिरा समोर राज्य मार्ग असून वाहनांची प्रचंड वाहतूक असते.
सदर बांधकाम विना परवानगी सुरू असून नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष का असा प्रश्न भाविकांना पडला आहे.
तात्काळ नगरपालिकेने याकडे लक्ष घालने गरजेचे आहे.

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज. कोल्हापूर*

anews Banner

Leave A Comment