Home रायगड श्री.राजन पांचाळ यांना डाॅक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल मा.चित्रलेखाताई पाटील व ग्रापंचायत आंबेपुरचे...

श्री.राजन पांचाळ यांना डाॅक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल मा.चित्रलेखाताई पाटील व ग्रापंचायत आंबेपुरचे मां. उपसरपंच आशिष चंद्रकांत पाटील यांनी सन्मानित केले.

105
0

Yuva maratha news

1000316778.jpg

श्री.राजन पांचाळ यांना डाॅक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल मा.चित्रलेखाताई पाटील व ग्रापंचायत आंबेपुरचे मां. उपसरपंच आशिष चंद्रकांत पाटील यांनी सन्मानित केले.

युवा मराठा न्यूज रायगड / पेझारी प्रतिनिधी :- मुजाहीद मोमीन

पुणे:पिंपरी चिंचवड येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात २० एप्रिल २०२४रोजी गांधी पीस फाऊंडेशन नेपाळचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.लालबहादूर राणा,पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, पद्मश्री डाॅ.विजयकुमार शहा,डाॅ.महेंद्र देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.राजन पांचाळ यांना डाॅक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
शेतकरी कामगार पक्षाच्या महीला आघाडीच्या अध्यक्षा.मा.चित्रलेखाताई पाटील आणि ग्रामपंचायत आंबेपुरचे मा. उपसरपंच आशिष चंद्रकांत पाटील यांनी श्री.राजन पांचाळ यांच्या पेझारी येथील निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मान केला.
संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात वैशिष्टय़पूर्ण आणि उल्लेखनीय विविध कार्य करणा-या गुणीजनांना मानद डाॅक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.या पदवीदान समारंभास ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डाॅ.आशा पाटील,गांधी पीस फाऊंडेशन भारताचे प्रभारी डाॅ.सुनील परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
गांधी पीस फाऊंडेशन नेपाळ आणि कर्तव्यदक्ष फाऊंडेशन पुणे याच्या संयुक्त विद्यमाने या पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री.राजन पांचाळ यांना मिळालेल्या डाॅक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांंकडूून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous articleतुमसर पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना असभ्य वागणूक ग्राहकाला मारहाण करण्याचा प्रयत्न
Next articleघाणखेडा संगमपूर येथे भैरवनाथ यात्रा महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह व शिव महापुरान कथा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here