Home कोल्हापूर जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने बंद ठेवून वडगांवातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनास उत्स्फूर्त पाठींबा.

जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने बंद ठेवून वडगांवातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनास उत्स्फूर्त पाठींबा.

131
0

राजेंद्र पाटील राऊत

जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने बंद ठेवून वडगांवातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनास उत्स्फूर्त पाठींबा.

कोल्हापूर( मोहन शिंदे) : व्यापारी असोसिएशन वडगांव व चेंबर आँफ काॅमर्स कोल्हापूर यांच्या आव्हानास पेठ वडगांव मधील सर्व व्यापाऱ्यांचा आंदोलनास उत्स्फूर्त पाठिंबा.
कोरोना महामारी मुळे गेली दोन महिने झाले शहरातील सर्वच व्यवहार बंद आहेत व्यापाऱ्यांची हालत दयनिय झालेली आहे.
सरकारी व स्थानिक पातळीवर वेळोवेळी निवेदन देऊनही व्यापाऱ्यांना कोणतीही सरकारी मदत अथवा करामध्ये सवलत दिली जात नाही. सरकारने दुकानदारांची अवस्था समजावून घ्यावी व लवकरात लवकर मागण्याची दखल घ्यावी अशी भावना व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली व्यापाऱ्यांची व्यथा प्रशासनाला कळावी म्हणुन अत्यावश्यक सेवेप्रमाणेच सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी यासाठी आज पेठ वडगांव शहरातील व्यापाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने जसे किराणा ,बेकरी , मेडिकल, दूध विभाग सकाळी ०७ ते दुपारी १२ .०० पर्यंत बंद ठेवून वडगांव व्यापारी असोसिएशनला पाठींबा दर्शविला. यावेळी व्यापारी असोसिएशन वतीने शासन दरबारी दखल घ्यावी यासाठी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांना निवेदन देण्यात आले. तसेच यावेळी पिसे , शहा, दुर्गूळे,पोळ, हुक्केरी या व्यापाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. आणि लवकरात लवकर शासनाने आम्हा सर्व व्यापाऱ्यांना अत्यावश्यक आस्थापने बरोबर इतर आस्थापने सुरू करण्याची परवानगी द्यावी असे मत वडगांव व्यापारी असोसिएशनच्या सभासदांनी व्यक्त केले. याप्रसंगी माजी. नगराध्यक्ष अभिजीत पोळ , मनोज शहा , सतिष माळी , विपूल वडगावे , संतोष लडगे , प्रविण दुर्गुळे , गणेश पिसे , रघुनाथ पिसे , राहुल काळे , योगेश हुक्केरी ,धान्यकिराणा भुसार कोरे, चौगुले , मयुर बुकशेट, राजकुमार पाटील, रोहित माळी, बबलू भक्ते , वैभव चौगुले , शैलेश शहा, गुंडुआण्णा चिंगळे, विनोद कोरे , तसेच शहरातील व्यापारी बंधू उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here