Home माझं गाव माझं गा-हाणं तौक्ते चक्रिवादळामध्ये नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार राजेश पाटील यांनी...

तौक्ते चक्रिवादळामध्ये नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार राजेश पाटील यांनी घेतली मस्त्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री श्री अस्लम शेख यांची भेट.

154
0

राजेंद्र पाटील राऊत

तौक्ते चक्रिवादळामध्ये नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार राजेश पाटील यांनी घेतली मस्त्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री श्री अस्लम शेख यांची भेट.
पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)-
दिनांक १६ मे,ते १८ मे दरम्यान राज्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी लागत असलेल्या गावांचे तसेच पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, शासनाकडून दिल्या जाणा-या नुकसान भरपाई निकषांमध्ये मच्छीमार बांधवांचा आपुलकीने विचार व्हावा म्हणून आमदार राजेश पाटील यांनी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री श्री अस्लम शेख साहेब* यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेटली व खालील दोन पर्याय सुचविले.
१) पालघर जिल्ह्यात एकूण १२ बोटी चक्रीवादळात फुटून पूर्णतः नष्ट झाल्या असून २ कोटींचा निधी १२ बोट मालकांना देण्यात यावा,जेणेकरून नुकसान ग्रस्त बोट मालकांना त्यांचा व्यवसाय नव्याने उभा करता येईल.
२) पुर्ण नुकसान झालेल्या बोट मालकांचे थकीत कर्जाचे नवीन कर्जात रूपांतर करून वाढीव कर्ज देऊन किमान पाच वर्ष बिनव्याजी कर्ज मिळाल्यास नुकसान ग्रस्त मच्छीमारांना आपला व्यवसाय उभा करण्यास व अभिमानाने जगण्यास मदत होईल.
या वेळी आमदार राजेश पाटील व इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here