Home नांदेड शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी इफको टोकियो पिक विमा कंपनी वर तात्काळ फसवणुकीचा गुन्हा...

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी इफको टोकियो पिक विमा कंपनी वर तात्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भीय पत्रानुसार पिक विमा मंजूर करण्याची मागणी.

140
0

राजेंद्र पाटील राऊत

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी इफको टोकियो पिक विमा कंपनी वर तात्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भीय पत्रानुसार पिक विमा मंजूर करण्याची मागणी.

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आज नांदेड येथे पीक विम्याचे गाढे अभ्यासक बालाजी पाटील ढोसणे यांनी शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी इफको टोकियो पिक विमा कंपनी वर फसवणुकीचे गुन्हे तात्काळ दाखल करून शेतकऱ्यांना माननीय आयुक्त साहेब कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भीय पत्रानुसार पिक विमा मंजूर करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी जिल्हाधिकारी प्रवीणजी कुलकर्णी साहेबांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

खरीप हंगाम 2020 मध्ये मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, तूर ,कापूस, ज्वारी आदी पिकांचा पिकविमा इफको टोकियो कंपनीकडे भरला होता. त्यात सोयाबीन व तूर पिकांचे मोठे नुकसान होऊन सुद्धा मुखेड तालुक्यातील सर्व महसूल मंडळे बाधित क्षेत्र घोषित असतानाही पिक विमा नामंजूर झाल्याने शेतकऱ्यात प्रचंड संतापाची लाट पसरली असून मा. जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ लक्ष घालून कोरोना या भयंकर महामारीत शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून दिलासा द्यावा. माननीय आयुक्त साहेब महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक 5 मार्च 2021 च्या पत्रानुसार महसूल कृषी जिल्हा परिषद विभागामार्फत 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्रांचे पंचनामे करण्यात आले असून तालुका व जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांच्या सविस्तर तपशील उपलब्ध आहे. अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेऊन अशा बाधित शेतकऱ्यांना क्षेत्र घटकानुसार नुकसान भरपाई अदा करणे बाबत तात्काळ कार्यवाही करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनास व कृषी आयुक्तालयात असताना मुखेड तालुक्यात फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्ती मधून 14050 शेतकऱ्यांना 12 कोटी 92 लाख 60505 रुपये इतकीच रक्कम मंजूर होते. तर काढणीपश्‍चात नुकसानीमधून 1973 शेतकऱ्यांना 1 कोटी 45 लाख 89499 रुपये इतकीच तुटपुंजी रक्कम मंजूर करून शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टा करण्याचा प्रकार इफको टोकियो पिक विमा कंपनीने केली असून, उत्पन्न आधारित नुकसानभरपाईची मुखेड तालुक्यातील 86 शेतकऱ्यांना 1 लाख 75371 रुपये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना आली असून गीता त्यामुळे पीक विमा भरताना शेतकऱ्यांना वेगळीच भूलथापा इफको टोकियो पिक विमा कंपनीने दिल्याने त्यांच्या प्रेमळ आश्वासनाला शेतकरी मायबाप कोरोना महामारीत फसले असून शेतकरी मायबापाची फसवणूक केल्याप्रकरणी इफको टोकियो पिक विमा कंपनी वर तात्काळ गुन्हे दाखल करून शासन निर्णयाप्रमाणे मुखेड तालुक्यातील आणखी शेतकरी पात्र होतात याचे कारण असे की नैसर्गिक आपत्ती फक्त तालुक्यात 14 हजार शेतकऱ्यांच्या शेतावरच होऊ शकते का? त्यामुळे 14 हजार शेतकऱ्यांचे पंचनामे ग्राह्य धरून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून दिलासा द्यावा. अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here