Home कोरोना ब्रेकिंग करून दाखवलं! आदित्य ठाकरेंनी दिली मुंबईतील ‘या’ परिसराबद्दल

करून दाखवलं! आदित्य ठाकरेंनी दिली मुंबईतील ‘या’ परिसराबद्दल

102
0

🛑करून दाखवलं! आदित्य ठाकरेंनी दिली मुंबईतील ‘या’ परिसराबद्दल Good News🛑
मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई 01 जून : ⭕ राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ज्या वरळी कोळीवाड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढली होती त्याबद्दल दिलासादायक माहिती दिली.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर वरळी कोळीवाड्याबद्दल महत्त्वाची घोषणा केली आहे. ‘सकारात्मक गोष्ट म्हणजे वरळी कोळीवाडा, जिथे सर्वप्रथम जास्त रुग्ण सापडले होते आणि कंटेनमेंट झोन बनविला गेला होता तिथे आता डी-कंटेनमेंट करण्यात आले आहे’ अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

त्यामुळे, ‘वरळी कोळीवाड्यात  केवळ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण असलेले ठिकाणे सील केली आहेत’ असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

‘मुंबईतला हा पहिला कंटेनमेंट झोन असल्याने कंटेनमेंट झोनच्या व्यावहारिक अडचणींबद्दल आपण पहिल्यांदाच समस्यांचा सामना केला. इतर भागांमध्ये कोविडशी लढण्यासाठी हे एक मॉडेल ठरले. तेथील रहिवाशांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे’ अशी भावनाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली आणि आमदार म्हणून निवडून आले. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना अचानक वरळी कोळीवाड्यातून सर्वाधिक रुग्ण समोर आले होते. त्यामुळे वरळीचा परिसर पूर्णपणे सील करून कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला होता.⭕

Previous articleमुंबईतील करोनाचा पहिला हॉटस्पॉट वरळी कोळीवाडा करोनामुक्तीकडे
Next articleगणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करणार नाही, मिरवणुकाही रद्द
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here