• Home
  • गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करणार नाही, मिरवणुकाही रद्द

गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करणार नाही, मिरवणुकाही रद्द

🛑 गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करणार नाही, मिरवणुकाही रद्द 🛑
मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ भव्य देखावे, उंच गणेशमूर्तींमुळे जगभर प्रसिद्धी पावलेल्या मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवात यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘साधेपणाचा’ नवा अंक पाहायला मिळणार आहे. परळचा राजा म्हणून ख्याती असलेल्या परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (नरेपार्क) यंदा फक्त ३ फुटांची गणेशमूर्ती घडवण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला. विशेष म्हणजे, भव्य गणेशमूर्तींसाठी ओळखल्या जाणाऱ्या खेतवाडी परिसरातील जवळपास ३१ मंडळे यंदा २ ते ५ फुटांच्या मूर्ती स्थापन करणार असल्याची घोषणा अखिल खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेवर ताण येऊ नये या दृष्टीने यंदाचा उत्सव साधेपणाने करण्याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे आवाहन करण्यात आले होते. हा निर्णय घेताना मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आजवर दाखवलेले सामाजिक भान, गणेशभक्त तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांची सुरक्षितता हे महत्त्वाचे मुद्दे ध्यानी घेण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केले होते. समितीच्या आवाहनानंतर अनेक मंडळांनी कमी उंचीच्या मूर्तीची स्थापना, तसेच सुरक्षित आणि अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने रूपरेषा आखत असल्याचे समितीला कळवले. त्यानुसार, हायड्रोलिक प्रभावळीचा पहिला प्रयोग केलेल्या ‘परळचा राजा’ची मूर्ती यंदा तीन फुटांची असेल. तसेच विभागातून वर्गणी न घेणे, विसर्जन मिरवणूक रद्द करून कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करणे आदी महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांनी सांगितले.

खेतवाडीतील ३१ मंडळांनी देखील करोना परिस्थितीचे भान राखत साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार विद्युत रोषणाई, देखावे आदींसाठी होणारा लाखोंचा खर्च टाळून, कमी उंचीच्या मूर्ती बसवण्यात येणार आहेत. तसेच विसर्जनासाठी मंडळाच्या आवारात कृत्रिम तलाव निर्माण केले जातील, अशी माहिती मध्यस्थ मंडळातर्फे नलिन मोदी यांनी दिली..

या निर्णयानंतर मुंबईसह उपनगरातील अनेक मंडळांनी आपापल्या ‘ऑनलाइन’ बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. तर लालबाग परिसरातील इतर मोठ्या मंडळांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली असल्याचे कळवले आहे. केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रदूषण मंडळाने नियमावली जाहीर केली असली तरी, राज्य शासनाने मात्र अद्याप कुठलीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशावेळी समितीतर्फे अधिकाधिक मंडळांशी संवाद साधण्यात आला आहे. तसेच सद्य सरकारच्या आदेशाची वाट पाहताना साधेपणाने उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना मंडळांना देण्यात आल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

माघ महिन्यात उत्सव

वडाळ्यातील राम मंदिर येथील जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाचा गणेशोत्सव भाद्रपद महिन्याऐवजी माघ महिन्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

चांगले निर्णय…

-विभागांतून वर्गणी न घेणे

-विसर्जन मिरवणूक रद्द

-कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन⭕

anews Banner

Leave A Comment