Home रायगड रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्लेवाडी येथे दिनांक 20/04/2024 वार -शनिवार रोजी...

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्लेवाडी येथे दिनांक 20/04/2024 वार -शनिवार रोजी शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.

32
0

Yuva maratha news

1000312562.jpg

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्लेवाडी येथे दिनांक 20/04/2024 वार -शनिवार रोजी शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.

युवा मराठा न्यूज रायगड / पेझारी प्रतिनिधी :- मुजाहीद मोमीन

मेळाव्याचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.समिर कासिम मुल्ला सर यांनी केले.प्रस्ताविकात त्यांनी शाळा पूर्व तयारी मेळाव्याची पार्श्वभूमी, गरज,त्या मधील स्टॉल, पालकांनी बालकांकडून करून घ्यावयाच्या कृती या विषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
तसेच ,शाळेतील पहिले पाऊल,पालकांसाठी आयडिया कार्ड,वर्क शिट,कृती पुस्तिका याबाबत सखोल मार्गदर्शन केले. *प्रसंगी दाखल पात्र विद्यार्थी, पालक ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच स्वयंसेवक, मदतनीस उपस्थित होते
गाव म्हटले तर शाळा आली आणि ज्या गावात पालक जागृत आणि उत्साही असेल तर त्या शाळेची व गावाची प्रगती कोणीच रोखू शकत. महाराष्ट्र शासनाने सत्र 2022-23 शैक्षणिक वर्षात वर्ग 1 ली भरती होणाऱ्या मुलांसाठी शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजन करण्याबाबत राज्यातील शाळेंना आदेशीत केले होते.
शाळा पूर्व तयारी ह्या अभियानाचा पहिला मेळावा रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्लेवाडी येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने राबविण्यात आले. शाळेतून गावकरी, पालक व विद्यार्थी यांनी प्रभात फेरी काढण्यात आली. येत्या शैक्षणिक वर्षात शाळेत नवीन दाखलपात्र विद्यार्थी आहे. गावातील मान्यवर व्यक्ती, समिती सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षक ह्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या डोक्यात टोपी घालून व पुष्पहारघालून शाळेत प्रवेशित झाल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन शाळेत येताना मुलांना लागणारे लेखन साहित्य देऊन सत्कार करण्यात आले. असे करत गावातील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन प्रभातफेरी शाळेत पोहचली. नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत रांगोळी काढण्यात आली होती.नंतर शाळेतील शाळापुर्व तयारी मेळावा स्टॉल चे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ व पालक यांच्या हस्ते करण्यात आले
नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्या उजव्या पायाचे ठसे घेऊन ते शाळेत संग्रहित करण्यात आले. जेणेकरून भविष्यात ही विद्यार्थी मोठे होतील त्यांना शाळेतील पहिले पाऊल आठवणीत राहील. ह्यानंतर शाळेतील लावलेल्या विविध स्टॉल वर विद्यार्थ्यांचे भाषा विकास, सामाजिक विकास, गणनपूर्वतयारी तपासण्यात आली. सर्व स्टॉल वर गावातील शिक्षित तरुण स्वयंसेवक म्हणून उत्साहात आपली जबाबदारी पार पाडत होते.
गावातील जबाबदार जागरूक नागरिक, उत्साही तरुण व कल्पक शिक्षक यांच्या साहाय्याने शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात पार पडला.
तसेच शेवटी शाळेचे मुख्याध्यापक समिर कासिम मुल्ला सर यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ आणि पालक ,मदतनीस , स्वयंसेवक, विद्यार्थी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Previous articleमनस्वी ग्रुप आयोजित आरोग्य शिबीर संपन्न.
Next articleमाहोरा येथे रामनवमी निमित्त हरी कीर्तन संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here