Home जालना माहोरा येथे रामनवमी निमित्त हरी कीर्तन संपन्न

माहोरा येथे रामनवमी निमित्त हरी कीर्तन संपन्न

86
0

Yuva maratha news

1000312564.jpg

माहोरा येथे रामनवमी निमित्त हरी कीर्तन संपन्न
माहोरा प्रतिनीधी- मुरलीधर डहाके 
सविस्तर वृत्त असे की, माहोरा येथे श्री राम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच रेणूका माता संस्थान माहोरा येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. तेथे राम नवमी च्या पावन पर्वावर ह. भ. प. सौ. सत्यभामाताई भुजंग यांचे दिनांक 17/04/2024 रोजी रात्री नऊ ते अकरा या वेळेत हरी किर्तन पार पडले. त्यांनी आपल्या वाणीतून अध्यात्माकडे कसे जावे हे रामायण व महाभारत यातील उदाहरण देऊन पटवून दिले. आजकालची पिढी वाईट विचार व वाईट गोष्टीकडे लवकर वळत असुन हि बाब समाजाच्या व देशाच्या दृष्टीने फार घातक असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या अमृत वाणितुन उपस्थितांना पटवून दिले.प्रत्येकाने भगवंताचे नामस्मरण करुन नाम चिंतनात काही वेळ घालविला पाहिजे.नामस्मरणाने वाईट विचार मनुष्याच्या जवळ येत नाहीत यासोबतच आपल्या हातुन कोणतेही चुकीचे काम होत नाही असेही त्यांनी सांगितले.भगवंताच्या नाम स्मरणात राहून वाईट गोष्टी पासून दूर राहता येत हे सुध्दा आपल्या हरी कीर्तनातून जनजागृती केली. तसेच कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी माहोरासह पंचक्रोशीतील भाविक व गावकरी महिला मंडळी मोठ्या प्रमाणात हरी कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here