Home जळगाव काचेवरील दव पुसण्याचे नादात ताबा सुटून तवेरा कन्नड घाटात कोसळली… मालेगावचे जण...

काचेवरील दव पुसण्याचे नादात ताबा सुटून तवेरा कन्नड घाटात कोसळली… मालेगावचे जण जागीच  4 ठार – चालकासह 6 जखमी…

221
0

आशाताई बच्छाव

IMG_20231128_061144.jpg

काचेवरील दव पुसण्याचे नादात ताबा सुटून तवेरा कन्नड घाटात कोसळली… मालेगावचे जण जागीच
4 ठार – चालकासह 6 जखमी…

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- अक्कलकोट येथून स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेवून मालेगाव कडे जाणाऱ्या तवेरा वाहन चालकाने काचेवरील दव पुसण्याच्या नादात वाहनावरील ताबा सुटून कन्नड घाटात तब्बल 300 फूट खोल दरीत तवेरा कार पडून 4 जण जागीच मयत झाले
तर तवेरा वरील चालकासाह 6 जण गंभीर जखमी झाले असून जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला तवेरा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
मालेगाव येथील भाविक दिनांक 26/11/2023 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास तवेरा वाहन क्र. MH 41 V 4816 ने अक्कलकोट येथुन स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेवून मालेगांव जात असतांना कन्नड घाटात समोरील काचेवर दव जमा झाल्याने सदर वाहन चालकाने जमा झालेले दव वाहनाचा वेग कमी करुन किंवा थांबवुन पुसुन घेणे आवश्यक असताना
तसे न करता वाहन चालकाने वाहनाचा वेग कमी न करता काचेवरील दव पुसण्याचा प्रयत्न करित असतांना चालक अभय पोपटराव जैन 50 (रा सटाणा नाका मालेगाव जि नाशिक) याचा वाहनावरील ताबा सुटला त्यामुळे वाहन खोल दरीत जवळपास 300 फूट कोसळून झालेल्या अपघातात
सौ.वैशाली धमेंद्र सुर्यवंशी 42, प्रकाश गुलाबराव शिर्के 68, सौ. शिलाबाई प्रकाश शिर्के 62, कु. पुर्वा गणेश देशमुख 7 सर्व रा. मालेगांव जि. नाशिक यांचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह अनुज धर्मेद्र सुर्यवंशी 19, कृष्णा वासुदेव शिर्के 5, सौ.पुष्पा पुरुषोत्तम पवार 41, सिध्देश पुरुषोत्तम पवार 7, सौ. रुपाली गणेश देशमुख 35 हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघात स्थळी चाळीसगांव पोलिस निरीक्षक संदीप पाटील, psi योगेश माळी यांनी मदतीचे आवाहन केले असता स्वत:चे जिवाची पर्वा न करता खोल दरित पोलीसांसोबत खाली उतरुन जखमींना वर आणण्यात मदत करणारे चाळीसगांव शहरातील वसिम चेअरमन,
स्वप्निल जाधव, नवाज शेख राजु, मुज्जफर रज्जाक शहा, ईकबाल शेख निसार, फरीद खान, मुबारक खान, सलिम खान, इम्रान खाटीक, सिंकदर शेख, जुबेर खाटीक, नईम खाटीक, गोगा शेख (पहेलवान) यांचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आभार मानले तसेच त्यांचा पो.स्टे.च्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे .

Previous articleचाळीसगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट मध्ये 415 हेक्टर शेती बाधित….
Next articleकाचेवरील दव पुसण्याचे नादात ताबा सुटून तवेरा कन्नड घाटात कोसळली… मालेगावचे  4 जण जागीच ठार – चालकासह 6 जखमी…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here