Home नांदेड मुखेड तहसिल कार्यालयात अवैध वाहतूक करणारे दोन वाळुचे टिप्पर जप्त मुख्यमंत्री शिंदे...

मुखेड तहसिल कार्यालयात अवैध वाहतूक करणारे दोन वाळुचे टिप्पर जप्त मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे कबनुरकर यांनी केली होती तक्रार

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20221211-WA0014.jpg

मुखेड तहसिल कार्यालयात अवैध वाहतूक करणारे दोन वाळुचे टिप्पर जप्त
मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे कबनुरकर यांनी केली होती तक्रार

पावती सांगली जिल्ह्याची अन वैधता संपलेली

 

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातून अवैध रेती वाहतुक होत असल्याची तक्रार बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनुरकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती याच तक्रारीने जिल्हा प्रशासन खडबडून जागे होत दि. 09 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास तालुक्यातील सलगरा फाटा येथून रेती वाहतुक करणारे दोन टिप्पर मुखेड तहसिल प्रशासनाने जप्त केले.

मागील एक महिण्यापासुन तालुक्यात अवैध रेती वाहतुकीचा मुद्दा मोठया प्रमाणात गाजत आहे. महसुल विभागाच्या वतीने या अगोदर दोन टिप्पर जप्त करुन मुखेड पोलिस स्टेशनच्या आवारात लावले आहेत. या अनुषंगाने शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बालाजी पाटील कबनुरकर यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांना तक्रार करीत तालुक्यात मोठया प्रमाणात अवैध रेती वाहतुक होत असुन यात अनेकांचा सहभाग असल्याने प्रधानमंत्री आवास लाभार्थ्यांना रेती सोन्याच्या भावात मिळत आहे. यामुळे गोर गरीब नागरीकांचे घरकुल बांधकाम करण्याचे स्वप्न अंधारमय झाले आहे.

या अवैध रेतीत असणा­-यांची चौकशी करावी व अवैध वाळु,मुरुम स्टोन,क्रेशर वाहतुक बंद करावी व प्रधानमंत्री आवास योजनेला घरकुल बांधकाम करण्यासाठी रेती स्वस्त करुन सर्व सामान्य , गोर गरीब नागरीकांना न्याय देण्याचे काम करावे असे निवेदनात नमुद आहे. या पत्राची जिल्हा प्रशासनाने दखल घेत मुखेडच्या महसुल पथकाने दि. 09 डिसेंबर २०२२ रोजी गाडी क्र. एम एच २४ ए. यु. ७७२७ व गाडी क्र. एम एच २४ ए. यु. २७२७ या दोन रेती वाहतुक करणारे टिप्पर जप्त करुन तहसिल कार्यालयाच्या आवारात लावले आहेत. या महसुल पथकात मंडळ अधिकारी प्रकाश यालावाड,
तलाठी नितीन भिसे, शिवाजी तोतरे यांचा समावेश आहे.
पकडण्यात आलेल्या दोन टिप्परचा पंचनामा करण्यात आला आहे.

चौकट

या गाडीत शिवाजी नगर सांगली जिल्ह्यात रेती टाकण्याच्या पावत्या आहेत
तर सदर पावत्याची मुदत संपल्याचे मंडळ अधिकारी प्रकाश यालावाड यांनी सांगितले.

चौकट…

या अगोदर जे दोन टिप्पर जप्त करण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल.

व्हि.एन.पाटे
प्रभारी तहसिलदार मुखेड

Previous articleमुखेड नपा प्रशासनाचा अजब कारभार नारस्ता ना नाली ना लाईट अश्या मूलभूत सुविधेपासून काही नागरिक वंचीत.
Next articleमुंबईतील करी रोड येथील अविघ्न इमारतीत परत अग्निविघ्न!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here