Home गुन्हेगारी सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलगा, तसेच व्यावसायिक. विजय वसंत ढुमे. यांची सिंहगड रोड वर...

सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलगा, तसेच व्यावसायिक. विजय वसंत ढुमे. यांची सिंहगड रोड वर सपासप वार करून खून….

154

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0031.jpg

सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलगा, तसेच व्यावसायिक. विजय वसंत ढुमे. यांची सिंहगड रोड वर सपासप वार करून खून….

पुणे ( सिंहगड रोड ) :- ( युवा मराठा प्रतिनिधी विलास पवार )
चिंचवड गावातील हॉटेल व्यावसायिक,पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांचा खास, सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलगा.विजय वसंतराव ढुमे यांची हत्या करण्यात आली आहे.
पुण्यात गणेश विसर्जनाची मिरवणूक संपते ना संपते तेच खुनाची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय वसंत ढूमे नावाच्या व्यक्तीचा लोखंडी गज आणि फावड्याने सपासप वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. सिंहगड रोड परिसरातील क्वालिटी लॉजजवळ आज. (२९/०९/२३) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनस्थली दाखल झाले आहेत.
सिंहगड रोड असणाऱ्या क्वालिटी लॉजमधून बाहेर आल्यावर पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी गज आणि फावड्याने हल्ला चढवला. हल्लेखोर त्यांच्यावर सपासप वार करत राहिले. विजय ढुमे हे रक्तच्या थारोळ्यात पडले होते. मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे…

Previous articleगुलाब घोडके यांनी शिक्षण क्षेत्रात मनोभावाने ३१ वर्ष सेवा केली — माजी आ. रोहिदास चव्हाण
Next articleगुरुकुल विद्यालय भातकुली येथे केंद्र भातकुली ची शिक्षण परिषद संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.