Home अमरावती गुरुकुल विद्यालय भातकुली येथे केंद्र भातकुली ची शिक्षण परिषद संपन्न.

गुरुकुल विद्यालय भातकुली येथे केंद्र भातकुली ची शिक्षण परिषद संपन्न.

121

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0029.jpg

गुरुकुल विद्यालय भातकुली येथे केंद्र भातकुली ची शिक्षण परिषद संपन्न.

भातकुली / प्रतिनिधी धनराज खर्चान

भातकूली – दि.३० सप्टेंबर २०२३ रोजी पं. स.भातकुली अंतर्गत केंद्र भातकुली मधिल सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील मुख्याध्यापक, विषय शिक्षक,सहायक शिक्षक यांच्या शिक्षण परिषदेचे आयोजन छोगालाल राठी गुरुकुल विद्यालय भातकुली येथे करण्यात आले होते.
सर्वप्रथम आद्यशिक्षिका,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून प्रतिमेला हारार्पण करण्यात आला. व उपस्थित मान्यवर,तज्ञ मार्गदर्शक यांचे पुष्पगुच्छ देवून तसेच वर्ग ८ वी.मधील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले.
या शिक्षण परिषदेला संतोष घुगे (शिक्षण विस्तार अधिकारी, पं. स.भातकुली) यांनी भेट देवून उपस्थित शिक्षक बंधू भगिनींना मार्गदर्शन केले.
या शिक्षण परिषदेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात आली.
(१) शालेय नेतृत्व विकास.
(२)FLN साठी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण.
(३)गणित अध्ययन अध्यापन.
(४)समावेशीत शिक्षण संबंधी विषय.
(५)गणित विभाग विविध उपक्रम व अध्ययन अध्यापन
(६)नवोपक्रम पूर्व तयारी.
(७)जिवन कौशल्य स्व ची जाणीव (self Awearness)
या विषयावर स्वाती यावले (सहा.शिक्षिका कवठा बहाळे) दीपाली पांडे (सहा शिक्षिका, चाकूर) व शैलेंद्र दहातोंडे ( केंद्रप्रमुख भातकुली) यांनी मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून संतोष घुगे (शिक्षण विस्तार अधिकारी,पं. स.भातकुली.),गजानन लेंडे (मुख्याध्यापक छोगालाल राठी गुरुकुल विद्यालय भातकुली),सुरेखा अटाळकर (केंद्र मुख्याध्यापिका भातकुली मुले), उमक मॅडम (मुख्याध्यापिका जडावबाई राठी कन्या विद्यालय भातकुली) व शैलेंद्र दहातोंडे (केंद्रप्रमुख भातकुली) उपस्थित होते तसेच शिक्षण परिषदेला केंद्र भातकुली मधिल सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक,विषय शिक्षक,सहायक शिक्षक उपस्थित होते.
शिक्षण परिषदेचे संचालन शैलेंद्र दहातोंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ताहेर नूर यांनी केले.शिक्षण परिषदेच्या यशस्वितेकरिता छोगालाल राठी गुरुकुल विद्यालय भातकुली मधिल सर्व शिक्षक बंधू भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.

Previous articleसेवानिवृत्त पोलिसाच्या मुलगा, तसेच व्यावसायिक. विजय वसंत ढुमे. यांची सिंहगड रोड वर सपासप वार करून खून….
Next articleस्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत आपले गाव आपला परिसर……..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.