राजेंद्र पाटील राऊत
निधन वार्ता
देगलूर येथील प्रसिद्ध व्यापारी
नंदूकिशोरसेठ शाखावार यांना मातृशोक
नांदेड प्रतिनिधी / राजेश एन भांगे
देगलूर येथील प्रसिद्ध व्यापारी श्री नंदकिशोर सेठ शाखावार
यांच्या मातोश्री भुमाबाई लक्ष्मणराव शाखावार (वय-१०४) यांचे आज सकाळी दिनांक १७ / ६ / २०२१ रोजी सकाळी साडे सहा वाजल्याच्या सुमारास प्राणज्योत मावळली तर त्यांच्या पार्थिवावर देगलूर शहरातील सार्वजनिक वैकुंठधाम येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
तर पत्रकार राजेश एन भांगे यांच्या पत्निचे ते आजी होते.
यावेळी अंत्यविधीस अनेक मान्यवरांनी येऊन श्रद्धांजली अर्पण केली.