Home माझं गाव माझं गा-हाणं बार्टी तर्फे सटाणा शहर व परिसरात वृक्षारोपण

बार्टी तर्फे सटाणा शहर व परिसरात वृक्षारोपण

142
0

राजेंद्र पाटील राऊत

_ बार्टी तर्फे सटाणा शहर व परिसरात वृक्षारोपण
सटाणा,(शशिकांत पवार प्रतिनिधी)-
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या समतादूत पथदर्शी प्रकल्पातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण राज्यात पाच जुन ते 20 जुन दरम्यान वृक्षारोपण पंधरवाडा साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने सटाणा येथील समतादूत उज्वला इंगोले सटाणा शहरातील काही शाळा व तालुक्यातील ग्रामपंचायत येथे वृक्षारोपण करण्यात आले.
नीम, शिसव, जांभूळ, आंबा, वड, पिंपळ, आवळा यासारखे विविध औषधी गुणधर्म असलेली वृक्ष तसेच फळझाडे आणि वटवृक्षांचे वृक्षारोपण दोद्धेश्वर पब्लिक स्कुल सटाणा, जिजाबाई दोधा मोरे पब्लिक स्कुल भाक्षी रोड, भाक्षी नववसाहत व भाक्षी ग्रामपंचायत कार्यालय व परिसरात ही झाडं लावण्यात आली. यावेळी समतादूत उज्वला इंगोले यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव, तालुका महासचिव दादा खरे, माजी तालुकाध्यक्ष चेतन वणीस, भाक्षी ग्रामपंचायतिचे ग्रामविकास अधिकारी शेख भाऊसाहेब, वसुली कर्मचारी आप्पा खैरनार, युवराज गवळी दोधेश्वर पब्लिक स्कुल चे शिक्षक दीपक पाटील, राहुल येशी, रायझिंग किड्स चे चेअरमन वैभव गांगुर्डे इत्यादी उपस्थित होते.

Previous articleओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
Next articleनिधन वार्ता देगलूर येथील प्रसिद्ध व्यापारी नंदूकिशोरसेठ शाखावार यांना मातृशोक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here