Home Breaking News युवा मराठा न्युजचा दणका…अर्धवट अंगणवाडीचे काम आठ दिवसात होणार पुर्ण!! युवा मराठाचे...

युवा मराठा न्युजचा दणका…अर्धवट अंगणवाडीचे काम आठ दिवसात होणार पुर्ण!! युवा मराठाचे राजेंद्र पाटील राऊत श्रीमती आशाताई बच्छाव यांचा सत्कार संपन्न..!

416

युवा मराठा न्युजचा दणका…अर्धवट अंगणवाडीचे काम आठ होणार पुर्ण!!
युवा मराठाचे राजेंद्र पाटील राऊत श्रीमती आशाताई बच्छाव यांचा सत्कार संपन्न..!
मुल्हेर,(गोपीनाथ भोये प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-गेल्या सहा वर्षापासून अर्धवट अवस्थेत बांधकाम करुन पडलेल्या अंगणवाडीचे बांधकाम तात्काळ पुर्ण करुन विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी व्यवस्था करुन देण्यात यावी,या मागणीसाठी “युवा मराठा न्युजच्या” वतीने पाठपुरावा सुरु करताच अंगणवाडीचे अर्धवट अवस्थेतील काम येत्या आठ दिवसात पुर्ण करुन देण्याचे ग्रामसेवक सुनील गांगुर्ड यांनी कबूल व मान्य केल्यामुळे आज “युवा मराठा”चे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत व व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव यांचा सत्कार करण्यात आला.
सटाणा तालुक्यातल्या पश्चिम भागातील आदिवासी पट्टयात असलेल्या भिमखेत गावी गेल्या सहा वर्षापासून अंगणवाडीची अर्धवट अवस्थेत इमारत बांधून पडलेली असून,अपुर्ण अवस्थेतील अंगणवाडी इमारतीमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याची बाब युवा मराठा न्युजचे निलेश भोये व गोपीनाथ भोये यांनी मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांच्या निर्दशनास आणून देताच,याबाबतीत तातडीने पाऊले उचलीत व पाठपुरावा करीत राजेंद्र पाटील राऊत यांनी संबंधित ग्रामसेवक सुनील गांगुर्ड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अंगणवाडीचे काम पुर्ण करण्याची मागणी केली तर येत्या आठ दिवसात अंगणवाडीचे काम पुर्ण करुन देतो आणि पंधरा आँगस्टपर्यत अंगणवाडी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्याचे ग्रामसेवक सुनील गांगुर्ड यांनी मान्य व कबूल केल्याने भिमखेत ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्याच अनुषंगाने आज भिमखेत येथे ग्रामसेवक शेख, युवा मराठाचे राजेंद्र पाटील राऊत व श्रीमती आशाताई बच्छाव यांचा सत्कार संपन्न झाला.यावेळी युवा मराठाचे भरभरून कौतुक करण्यात आले.आणि युवा मराठाच्या धडाकेबाज कामगिरीमुळेच भिमखेतवासियांना न्याय मिळाला अशी भावना व्यक्त करीत युवा मराठाचे खुप खुप अभिनंदन करण्यात आले.याप्रसंगी
निलेश भोये, गोपिनाथ भोये ,शिक्षक पंडीत महाले, ग्रामसेवक शेख भाऊसाहेब, देवराम भोये पंडित भोये रामदास भोये वैशाली चौधरी मॅडम, मदतनीस लताबाई व.अजंना भोये आदी बहुसंख्येने हजर होते.