Home अमरावती मतदानासाठी यंत्रणा सज्ज, १९८३ केंद्रावर १८.३६ लाख मतदार: जिल्हाधिकारी म्हणतात गोंधळ झाल्यास...

मतदानासाठी यंत्रणा सज्ज, १९८३ केंद्रावर १८.३६ लाख मतदार: जिल्हाधिकारी म्हणतात गोंधळ झाल्यास १० मिनिटात पोहोचणार पोलीस.

39
0

Yuva maratha news

1000315160.jpg

मतदानासाठी यंत्रणा सज्ज, १९८३ केंद्रावर १८.३६ लाख मतदार: जिल्हाधिकारी म्हणतात गोंधळ झाल्यास १० मिनिटात पोहोचणार पोलीस.
____________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती
अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उद्या शुक्रवारी, २६ एप्रिल ला सकाळी ७ते सायंकाळी ६ या वेळात मतदान होत आहे. त्यासाठी १ हजार ९८३ केंद्र स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे १८ लाख ३६ हजार ७८ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. दरम्यान यापैकी कोणत्याही केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्यास १० मिनिटाच्या आत पोलीस पोहोचतील. एवढेच नव्हे तर ईव्हीएम मध्ये दोष निर्माण झाल्यास तेवढ्यात वेड्यात मशीन बदलले जाईल, असे नियोजन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. माध्यमांशी बोलताना कटियार म्हणाले, लोकसभा मतदारसंघातील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राची तया उभंरी पूर्ण करून घेण्यात आली असून आज, गुरुवारी सकाळपासूनच पोलीस पार्टीज(मतदान केंद्र पथक) रवाना होत आहेत. उशिरा सायंकाळपर्यंत सर्व केंद्र सुसज्जित होणार असून त्या त्या केंद्रावरील अधिकारी कर्मचारी तिथे पोहोचलेले असतील. सर्व मतदान केंद्रावर मतदारासाठी सावली, पिण्याचे पाणी, अपंग किंवा वयस्कर मतदारासाठीच व्हीलचेअर, प्रतीक्षा कक्ष, प्रथम आचाराचे साहित्य आधीची व्यवस्था करण्यात आल्याची यावेळी सांगण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या मते निवडणूक प्रचार कालावधी यंत्रणेकडे विविध प्रकारच्या ३६१ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३१० तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. उमेदवारांनी प्रचार दरम्यान केलेल्या आचारसंहितेचा भंग अशा स्वरूपाच्या या तक्रारी होत्या. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. नवीन चंद्र रेड्डी व जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनीही यांच्या कार्यालयातर्फे केलेल्या कारवाईचा आढावा सादर केला. निवडणूक कालावधीत १ कोटी ९५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून त्यासंबंधीची चौकशी अद्याप पूर्णत्वास न गेल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषद निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे जिल्हा माहिती अधिकारी अर्पणा यावलकर आधी अधिकारी उपस्थित होते. निवडणूक कालावधी १७० जनाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून १२५ प्रकरणामध्ये दारूबंदी कायद्यांना वेगळे नोंदविण्यात आले आहे. याशिवाय गुंड प्रवृत्तीच्या ३४ जणांना तडीपार करण्यात आले असून दोघांवर एम पी डी ए नवे कारवाई करण्यात आली आहे. मादक द्रव्य व नशेचे पदार्थ बाळगून त्यांची विक्री करणाऱ्या (एन डी पी एस) ५ जनावरही गुन्हे दाखल झाल्याचे पोलीस आयुक्त यांनी यांनी पोस्ट केले. अशाप्रकारे ३०० व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

Previous articleरुग्ण मतदानापासून राहणार वंचित, १५ हजार ऍडमिट पेशंट! ते मतदान करणार कसे?
Next articleगांधी पीस फाउंडेशन नेपाळच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प प्रदान सोहळा पुणे येथे संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here