Home परभणी येलदरी धरणातील पाणीसाठ्यात ३ दलघमीची वाढ

येलदरी धरणातील पाणीसाठ्यात ३ दलघमीची वाढ

121

आशाताई बच्छाव

IMG-20220623-WA0021.jpg

येलदरी धरणातील पाणीसाठ्यात ३ दलघमीची वाढ

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)
परभणी:-जिंतूर तालुक्यातील येलदरीसह परिसरात दोन दिवस जोरदार पाऊस झाला. सुमारे एक ते दीड तास पावसाने हजेरी लावली. येलदरी धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात ३ दलघमीची वाढ झाली. पाणलोट क्षेत्रात ५७ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे. पाऊस लांबल्याने पेरणी ही लांबली होती. मात्र, पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी खरीप हंगामात पेरणी करत आहेत.