Home नांदेड नांदेडच्या वजीराबाद डी.बी. पथकांची धाडसी कार्यवाही. ▪️१३ लाख ८० हजार ३३० रुपयाचा...

नांदेडच्या वजीराबाद डी.बी. पथकांची धाडसी कार्यवाही. ▪️१३ लाख ८० हजार ३३० रुपयाचा मुद्देमाल जप्त महिला आरोपीस अटक सपोनि संजय निलपत्रेवार यांच्यासह पोलिसांची दमदार कार्यवाही.

67
0

आशाताई बच्छाव

IMG-20220624-WA0004.jpg

नांदेडच्या वजीराबाद डी.बी. पथकांची धाडसी कार्यवाही.
▪️१३ लाख ८० हजार ३३० रुपयाचा मुद्देमाल जप्त महिला आरोपीस अटक सपोनि संजय निलपत्रेवार यांच्यासह पोलिसांची दमदार कार्यवाही.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नांदेड येथील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या दर्वेशनगर हिंगोली नाका येथील रहिवासी असलेल्या मावशीच्या घरी पुतणी दिनांक ८ जून २०२२ रोजी हळदीच्या कार्यक्रमाला गेली होती सदरील घरात प्रवेश करुन कुलूप तोडून रूमच्या आतील आलमारीतील लॉकर तोडून आत मध्ये ठेवण्यात आलेले रोख रक्कम १३ लाख रुपये व दीड टोळ्याचे गल्सर ५ ग्रामचा पत्ता ५ ग्रामची सोन्याची अंगठी, असे एकूण १४ लाख रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यानी चोरून नेला असल्याची तक्रार दिनांक १० जून २०२२ रोजी फिर्यादी फयुम अब्दुल गफार खुरेशी वय ३० वर्ष व्यवसाय व्यापारी गवळीपुरा हिंगोली नाका नांदेड यांनी दिली.

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,आप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर चंद्रसेन देशमुख यांच्या सुचनेनुसार वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा पथक प्रमुख संजय डी. निलपत्रेवार यांनी त्यांच्या पोलीस टीम मधील पोलीस कर्मचारी पोना गजानन किडे, विजय नंदे, संतोष बेलूरोड, शेख इम्रान, रमेश सूर्यवंशी व महिला पोलीस कर्मचारी शुभांगी कोरेगावे आदीनी कौतुकास्पद कामगिरी बजावत महिला आरोपीस जेरबंद करण्यात पोलीस अधिकारी यशस्वी झाले.

वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरी प्रकरणात ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी. निलपत्रेवार यांनी आपल्या पोलीस सहकार्यासह फिर्यादीच्या पत्नीस विश्वासात घेऊन तपास जारी केला असता तिच्या कडून चोरीस गेलेला मुद्देमाल नगदी तेरा लाख ८० हजार ३३० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरच्या महिला आरोपीस मा. न्यायालयात वजीराबाद पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी हजर केले असता महिला आरोपीस एका दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असल्याचे माहिती सपोनि निलपत्रेवार यांनी दिली.

Previous articleयेलदरी धरणातील पाणीसाठ्यात ३ दलघमीची वाढ
Next articleयोग साधना माणसाला आनंदी राहण्याचे बळ देणारे शास्त्र आहे – प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here