Home नांदेड आमदार डॉ. तुषार राठोड यांना मंत्रीपद मिळण्यासाठी विठ्ठलाकडे साकडे.

आमदार डॉ. तुषार राठोड यांना मंत्रीपद मिळण्यासाठी विठ्ठलाकडे साकडे.

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20220710-WA0035.jpg

आमदार डॉ. तुषार राठोड यांना मंत्रीपद मिळण्यासाठी विठ्ठलाकडे साकडे.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड-पक्ष वाढीसाठी सर्वस्व पणाला लावणारे मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड यांना शिंदे – फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद मिळावे ही तमाम आमदार डॉ. तुषार राठोड समर्थकांची अपेक्षा आहे. मंत्रीमंडळ विस्तारामध्ये आमदार डॉ तुषार राठोड यांना राज्यमंत्री पद मिळण्यासाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पत्रकार दत्ता पाटील माळेगावे गोजेगावकर यांनी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले आहेत.
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर होऊन भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन झाले आहे. पक्षसंघटना मजबुतीसाठी सर्वस्व पणाला लाऊन नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथम भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलविणारे स्वर्गवासी माजी आमदार गोविंदराव राठोड यांचे सुपुत्र मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.तुषार राठोड यांना राज्यमंत्रीपद मिळण्याचा योग आला आहे. सत्तेची अभिलाषा न बाळगता पक्ष संघटन वाढीसाठी सर्वस्व पणाला लावून निष्ठेने भाजप कार्य करणारे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांना राज्यमंत्रीपद मिळावे यासाठी पत्रकार दत्ता पाटील माळेगावे गोजेगावकर यांनी पांडुरंगा कडे साकडे घातले आहेत.

Previous articleआदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळ यांचे कडुन पंडित जवाहरलाल नेहरू नप उच्च प्राथमिक शाळेला शालेय पुस्तके भेट
Next articleकेरसाणे इरा स्कुलची तेजस्वी मोरेची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here