Home अमरावती रुग्ण मतदानापासून राहणार वंचित, १५ हजार ऍडमिट पेशंट! ते मतदान करणार कसे?

रुग्ण मतदानापासून राहणार वंचित, १५ हजार ऍडमिट पेशंट! ते मतदान करणार कसे?

36
0

Yuva maratha news

1000315155.jpg

रुग्ण मतदानापासून राहणार वंचित, १५ हजार ऍडमिट पेशंट! ते मतदान करणार कसे?
___________
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना तसेच जनजागृती कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे .परंतु, जे मतदार आपल्या आरोग्याच्या समस्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांचे मतदान कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या वतीने या रुग्णाच्या मतदाना संदर्भात कोणतीही उपाययोजना राबविण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयाची संख्या लक्षात घेता पंधरा हजाराच्या जवळपास हे उपचारार्थ रुग्णालयात भरती असल्याची प्राथमिक माहिती आहे. लोकशाहीच्या सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. वाढविण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मतदान जनजागृती मोहीम देखील राबविण्यात आली. तसेच मतदानाच्या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी दिव्यांग तसेच ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या वय वृद्ध मतदारांच्या घरी जाऊन प्रशासनाने मतदान प्रक्रिया देखील राबवली. परंतु रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या रुग्णांच्या मतदानासाठी कोणतीही उपाययोजना प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेली नसल्याचे बोलले जात आहे. अमरावती जिल्ह्यातील९ तालुके हे अमरावती मतदारसंघात असून, ५ तालुके वर्धा मतदार संघात आहे. त्यामुळे येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेले रुग्ण हे मतदानापासून वंचित राहणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात २४ शासकीय रुग्णालय आहेत तर ६० प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तर खाजगी रुग्णालयाची संख्या देखील शंभर पेक्षा अधिक आहे. त्यामुळे येथे उपचारार्थ भरती रुग्णांची संख्या ही १५ते२० हजाराच्या जवळपास असून, ते मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या रुग्णाच्या सेवेमध्ये त्या रुग्णाच्या घरातील किमान एक तरी व्यक्ती व्यस्त आहे. त्यामुळे रुग्णसेवेत व्यस्त असलेल्या व्यक्ती देखील मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्भवती महिलाही राहणार मतदानापासून वंचित. जिल्हा स्त्री रुग्णालय तसेच अचूक पूर येथील स्त्री रुग्णालय येथे शकलो महिला गर्भवती महिला उपचारासाठी भरती असतात. त्यामुळे या महिलांनाही मतदान केंद्रावर पोहोचणे शक्य नाही. त्याचबरोबर क्षयरोग तसेच इतर संसर्गजन्य आजाराचे रुग्ण देखील मतदान केंद्रावर जाऊ शकत नाही व मतदान करू शकत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून या रुग्णासाठी मतदानाची विशेष सुविधा होणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here