Home नांदेड किनवट गो-रक्षक हल्ला व हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या , हिंदू...

किनवट गो-रक्षक हल्ला व हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या , हिंदू संघटणे कडून मागणी.

74
0

आशाताई बच्छाव

IMG-20230623-WA0001.jpg

किनवट गो-रक्षक हल्ला व हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या , हिंदू संघटणे कडून मागणी.

देगलूर प्रतिनिधी, गजानन शिंदे

किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ जवळील मलकजांब तांडा येथे कांही गौ तस्कारांनी गोरक्षककांवर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी देगलूर तालुक्यातील हिंदू संघटनानी दि 22 रोजी उपजिल्हा अधिकारी कार्याल्या मार्फत मुख्यमंत्री यांच्या कडे दोषीना फाशी व मृत व्यक्तीच्या कुंटूबियाना 50 लाख रुपये तर जखमीना 10 लाख रुपये देन्याची मागणी केली . किनवट तालुक्यातील मलक जांब तांडा येथे गौतस्कारांनी गौरक्षककांवर जिवघेणा हल्ला केला यात दुर्देवानी गोरक्षक स्व . शेखर रापेलीवार बांधवाचा यात मृत्यू झाला या सोबत असलेले गोरक्षक बांधव या हल्यात चार जन जखमी झाले. दरम्यान शासन मृत्यू झालेल्या स्व.शेखर रापेलीवार यांच्या कुंटूबियाना 50 लाख रुपये तर जखमीना 10 लाख रुपये देण्यात यावी त्याच बरोबर परप्रांतातून व परप्रांतात होणारी गोवंश तस्करी थांबवण्यासाठी राज्य शिमेवर विशेष पोलीस चौकी उभारण्यात यावी जिल्ह्यात व पूर्ण महाराष्ट्रात गौ रक्षकांवर वारंवार हाल्ले होत आहेत. आशा घटनाकडे सरकार गांभिर्याने घेऊन दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशि मागणी देगलूर तालुका येथील हिंदू संघटना विश्वहिंदू परिषद व बजरंगदला तर्फे लेखी निवेदना द्वारे उपजिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कडे मागणी करण्यात आली. यावेळी प्रशांत दासरवार माजी नगरसेवक देगलूर, दत्तात्रय पांचाळ, सुरेष नाईनवाड,विनोद शंकरराव रायकोडे, बजरंग किरवार,बालाजी विश्वनाथराव धडेवार, राजेश आऊलवार,बजरंग कंचनवार, रितेश चंदावार, . बाबू रघुनाथ . राजेश रामराव आऊलुवार , राजेश पेडीवार,व्यंकटेश पिसारी , बालाजी पाटील , घाळपा आंबेंसंगे, शैलेश शिवाजीराव , शुभम नाईकवाड,नरेश हंदीखेरे, नरेश राचलवार, प्रविण , शिवकुमार देवाडे आदीसह विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाचे असंख्य असे हिंदूसंघटनेचे कार्यकृते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here