Home नांदेड शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी पंचवीस हजारांची आर्थिक मदत जाहीर करा महाराष्ट्राचे कृषीमंत्री...

शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी पंचवीस हजारांची आर्थिक मदत जाहीर करा महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी.

319

आशाताई बच्छाव

IMG-20230622-WA0033.jpg

शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी पंचवीस हजारांची आर्थिक मदत जाहीर करा महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी.

देगलूर तालुका प्रतिनिधी, गजानन शिंदे

बळिराजाला नेहमी आस्मानी संकटानाचा सामना करावे लागत असल्यामुळे नेहमी बळिराजा निराश होऊन आत्महत्या सारखे पाऊल उचलतो गेल्या अनेक वर्षांपासून बळिराजाला रब्बीचा दुष्काळ खरिप चा दुष्काळ आवकळी पाऊस कधी अतिवृष्टी तर कधी पिक काढणीच्या वेळी होत असलेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जात आहे रब्बी हंगामात व खरिप हंगामात पिकांची नासाडी अवेळी होत असलेल्या पाऊसाने होताना दिसुन येते त्यातुन शेतकरी काही पिकवला तर त्याला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कधी आस्मानी तर सुलतानी संकटांना सामोरे जावे लागते
तसेच पिक पेरणीसाठी लागणारे बियाणे ते पण सध्या बोगस बियाणे व बियानाच्या व खतांचे होत असलेला काळा बाजार अशाने शेतकरी बेजार झाला आहे सततच्या नापिकीमुळे मिळत नसलेला भावाने शेतकऱ्या जवळ बि बियाणे घेण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे ते सावकारी कर्जाच्या दारात उभारुन ते सावकारी कर्ज काढून पेरणी करतात व तो सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडले जातात व त्यातून त्यांची मुक्तता होताना दिसुन येत नाही या सर्व संकटामुळे शेतकरी हतबल होत आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे आत्महत्याचे प्रमाण खूप आहे अश्या सर्व संकटातुन शेतकर्यांची सुटका करण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन प्रति हेक्टरी पंचवीस हजारांची आर्थिक मदत द्यावी कारण शेतकरी जगला तर देश जगेल त्याठी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी पंचवीस हजारांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी करतेवेळी देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी

Previous articleकिनवट गो-रक्षक हल्ला व हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या , हिंदू संघटणे कडून मागणी.
Next articleनांदेड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाची युद्धपातळीवर तयारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.