Home नांदेड नांदेड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाची युद्धपातळीवर तयारी

नांदेड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाची युद्धपातळीवर तयारी

100
0

आशाताई बच्छाव

IMG-20230623-WA0000.jpg

नांदेड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाची युद्धपातळीवर तयारी

• सर्व विभाग प्रमुखांकडून लाभार्थ्यांचे नियोजन
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
नांदेड (जिमाका) दि. 22 :-राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार 25 जून रोजी “शासन आपल्या दारी” हा भव्य कार्यक्रम अबचलनगर नांदेड संपन्न होत आहे. या कार्यक्रमाची जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर पूर्व तयारी केली जात आहे. प्रत्येक लाभार्थ्यांला या कार्यक्रमात विनासायास सहभागी होता यावे यादृष्टीने गटनिहाय नियोजन केले आहे. उष्णता व इतर बाबी लक्षात घेता मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्यासह इतर व्यवस्था काटेकोरपणे करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी सर्व गटनिहाय अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात “शासन आपल्या दारी” या अभियानाच्या पूर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय दंडाधिकारी विकास माने, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख गजानन पाटील, मराठवाडा प्रमुख बाबासाहेब थेटे व इतर विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

इतर जिल्ह्यातील कार्यक्रमांचा अनुभव पाठिशी घेवून नांदेड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे मिनिट टू मिनीट व शहरात येणाऱ्या वाहतुकीचे नियोजन पोलीस व परिवहन विभागाने केले आहे. हा कार्यक्रम अधिकाधिक लोकसहभागातून शासकीय योजनांचा महाउत्सव बनेल, असा विश्वास अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here