Home पश्चिम महाराष्ट्र नरभक्षक बिबट्याला मारण्यात अखेर वनविभाला यश; धवलसिंह मोहिते पाटलांच्या गोळीने घेतला बिबट्याचा...

नरभक्षक बिबट्याला मारण्यात अखेर वनविभाला यश; धवलसिंह मोहिते पाटलांच्या गोळीने घेतला बिबट्याचा वेध

100
0

राजेंद्र पाटील राऊत

नरभक्षक बिबट्याला मारण्यात अखेर वनविभाला यश; धवलसिंह मोहिते पाटलांच्या गोळीने घेतला बिबट्याचा वेध
(,प्रतिनिधी-महादेव घोलप, सोलापूर.)

सोलापूर _ गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या आणि आतापर्यंत तीन जणांचे प्राण घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभागाला यश आले आहे.
सोलापूर : करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभाला अखेर यश आलं आहे. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला. वांगी नं.4 रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती.
अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे(शॉप शुटर) यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर 3 गोळ्या फायर करीत त्याला आज दिनांक 18/12/2020 सायंकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी ठार केले.
व गेल्या अनेक दिवसांपासून वांगी परिसरातच नव्हे तर संपूर्ण करमाळा तालुक्यात दाहशितेचे वातावरण निर्माण झाले होते.पण ते भीतीचे वातावरण आता कमी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here