Home नांदेड मुखेड शहरातील १६ वाॅटर प्लांटला नपाने ठोकले सील… •••••••••••••••••••••••••••••••••• वाॅटर फिल्टर प्लांटधारक...

मुखेड शहरातील १६ वाॅटर प्लांटला नपाने ठोकले सील… •••••••••••••••••••••••••••••••••• वाॅटर फिल्टर प्लांटधारक आर्थिक संकटात सापडणार

117
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड शहरातील १६ वाॅटर प्लांटला नपाने ठोकले सील…
••••••••••••••••••••••••••••••••••
वाॅटर फिल्टर प्लांटधारक आर्थिक संकटात सापडणार
•••••••••••••••••••••••••••••••••••
मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड शहरातील सोळा वॉटर प्लांट धारकांना नोटीस देऊनही भूजल प्राधिकरण , प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न औषध प्रशासन यांची परवानगी घेतली नसल्याने मुख्याधिकारी विजयकुमार चव्हाण यांच्या आदेशाने नगर परिषद प्रशासनाने विनापरवाना वाॅटर प्लांटला सील ठोकले. लाॅकडाऊनमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या वाॅटर फिल्टर प्लांट धारक आर्थिक संकटात सापडण्याचे चिन्हे दिसत आहेत.
शहरात अनेक वर्षापासून खाजगी व्यावसायिकांनी वॉटर फिल्टर प्लांट उभारले आहे. त्यांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना अल्प दरात फिल्टरचे जार उपलब्ध होऊ लागले . नागरिकांनी हे शुद्ध पाणी वापरल्याने डायरिया, कावीळ, गॅस्ट्रोचे प्रमाण आटोक्यात आले. हा वॉटर प्लांट उभारण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी, खासगी तसेच बँकेचे कर्ज घेऊन नगरपालिकेची रीतसर परवानगी घेऊन हा व्यवसाय सुरू केला . हे पाणी जनतेला अल्प दरात शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले. पण अचानक राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार केंद्रीय भुजल प्राधिकरण यांची परवानगी/प्रमाणपत्र / नाहरकत प्रमाणपत्र जर घेतले नसेल तर शुध्द (आर.ओ.) वाॅटर कॅन विक्री करणाऱ्या विरूद्ध सील बंद कारवाई करण्याची नोटीस संबंधित प्लांट धारकांना बजवाण्यात आली होती. प्लांट धारक सर्व विभागाच्या परवानगी मिळविण्यासाठी आटापिटा करीत होते. पण नोटीसीची मुदत संपल्याने नगर परिषद प्रशासनाने शहरातील शुध्द पाणी, फिल्टर वाॅटर प्लांटला सील ठोकले. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे इंजी. सागर पडोळकर यांनी दिली. सदर कारवाई मुख्याधिकारी विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पाणीपुरवठा विभागाचे इंजी. सागर पडोळकर, इंजी. ज्ञानेश्वर गुट्टे, शिवशंकर कुचेवाड, भारत गजलवाड, कार्यालयीन अधिक्षक सुधीर सरोदे, शहर समन्वयक भिमराव गोवंदे, गौरव जाधव आदींनी केली.

Previous articleनरभक्षक बिबट्याला मारण्यात अखेर वनविभाला यश; धवलसिंह मोहिते पाटलांच्या गोळीने घेतला बिबट्याचा वेध
Next articleकामात केलेली हलगर्जी भोवली, चार शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याचे दिले गेले आदेश..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here