Home माझं गाव माझं गा-हाणं साल्हेर गावात वाजू लागली अखेर मोबाईलची ट्रिंग ट्रिंग युवा मराठाच्या पाठपुराव्याला मोठे...

साल्हेर गावात वाजू लागली अखेर मोबाईलची ट्रिंग ट्रिंग युवा मराठाच्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त.

95
0

राजेंद्र पाटील राऊत

साल्हेर गावात वाजू लागली अखेर मोबाईलची ट्रिंग ट्रिंग युवा मराठाच्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त…! साल्हेर/नारायण भोये विभागीय संपादक
साल्हेर या बागलाण तालुक्याततील पश्चिम पट्टयातल्या आदिवासी भागात मोबाईलची रेंजच नसल्यामुळे नागरिक विविध कामापासून वंचीत राहिले जात होते.
वास्तविक खासदार डाँ. सुभाष भामरे यांनी दतक घेतलेले साल्हेर हे गाव पर्यटनस्थळ म्हणून नावलौकिक प्राप्त असतानाही या भागात मोबाईलचा चालत नसल्याने नागरिक विशेष अडचणीत सापडलेले होते.रेशनवरील थंब आणि विविध आँनलाईनच्या कामांना यामुळे मोठा अडथळा निर्माण होत होता.
मात्र या आदिवासी भागातल्या मोबाईल रेंजच्या समस्येचा सातत्याने पाठपुरावा करीत “युवा मराठा”ने त्या भागाचे जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांची भेट घेऊन मोबाईल टाँवर तात्काळ सुरु करण्याची मागणी लावून धरलेली होती,अखेर “युवा मराठा”च्या पाठपुराव्याला यश येऊन या साल्हेरसह भिकारसोंडा,महारदर,साळवण,वगरीपाडा,घुळमाळ,भाटंबा,केळझर ,तताणी, बारीपाडा भागात आता मोबाईलची ट्रिंग ट्रिंग वाजायला सुरुवात झाली आहे.जिओ या खासगी कंपनीने हा मोबाईल टाँवर सुरु केल्याने या भागातील नागरिकांचा आनंद अत्यंत उत्साहवर्धक असल्याचे बघावयास मिळाले.नागरिकांनी “युवा मराठा”चे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here