Home मुंबई लोअर परळ विभागातील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीने दहावी शालांत परिक्षेत घवघवीत यश प्राप्त...

लोअर परळ विभागातील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीने दहावी शालांत परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20230602-WA0025.jpg

लोअर परळ विभागातील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीने दहावी शालांत परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले

मुंबई : ( विजय पवार प्रतिनिधी )
आई-वडील आपली स्वप्न मुलांमध्ये पहात असतात. त्यासाठी ते कठोर परिश्रम घेतात. मात्र स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मुलांकडूनही अथक परिश्रम, जिद्द, आणि चिकटीची जोड लागते. ती असेल तर कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी यशाचं शिखर सर करता येत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेद्वारा जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत आय. ई.एस.माॅर्डन इंग्लिश स्कूल दादरची विद्यार्थिनी दुर्वा प्रसाद भोसले हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत (इंग्रजी माध्यम) घवघवीत यश संपादन केले आहे.

लोअर परळ विभागातील वृत्तपत्र विक्रेते प्रसाद भोसले यांची मुलगी व बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले यांची पुतणी दुर्वा भोसले हिने दहावी शालांत परिक्षेत ९४.८०% प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.

कु.दुर्वा हिने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग,क्लासचे शिक्षक कनेरकर सर, तसेच आजी, आजोबा, आई, वडील व काका,काकी यांना दिले आहे.
शाखाप्रमुख गोपाळ खाड्ये, गोवर्धन सोसायटीचे अध्यक्ष अंकुश पलसे, उपशाखाप्रमुख संतोष मोरे, यांनी घरी जाऊन दुर्वासह सर्व भोसले परिवाराचे अभिनंदन केले. दुर्वाच्या या यशप्राप्तीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. मुंबईतील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना अभिमान वाटेल असेच हे यश आहे. बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे सरचिटणीस श्री. संजय चौकेकर यांनी दुर्वा भोसले हिला शाबासकी दिली व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleजिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर वरली चे दुकान लावून आंदोलन करण्यात येईल…
Next articleखेड तालुक्यातील शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कुल ची १००% निकालाची परंपरा कायम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here