Home बुलढाणा अर्धवट असलेल्या पुलांमध्ये पडल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू,बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष

अर्धवट असलेल्या पुलांमध्ये पडल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू,बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0020.jpg

अर्धवट असलेल्या पुलांमध्ये पडल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू,बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष

वरवट बकाल – बावनबीर रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील बावनबिर ते एकलारा या दोन्ही गावांच्या मध्ये पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे या पुलावर कुठल्याही प्रकारचे फलक लावण्यात आलेले नाही बावनबीर कडून वरवट बकाल कडे पोलिस कर्मचारी संतोष राजपूत हे त्यांच्या एम एच 28 ए के 22 77मोटरसायकलने येऊन राहिले होते या पुलावर दिशादर्शक फलक नसल्याने त्यांना समजले नसल्याचे तेथे उपस्थित नागरिक बोलत होते त्यामुळे या पुलांमध्ये पडून संग्रामपूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले बीट जमदार संतोष राजपूत वय 38 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आठ वाजेच्या दरम्यान घडली. सोनाळा पोलीस स्टेशन च्या ठाणेदार त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन त्यांना प्राथमिक उपचार साठी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.ही घटना सार्वजनिक बांधकाम विभागाने साफ दुर्लक्ष मुळे घडली आहे.याबाबत वारंवार वृत्तपत्र मध्ये बातमी सुद्धा प्रकाशित करण्यात आल्या होत्या ,तरी संबंधित विभागाने दखल घेतली नसून त्यामध्ये एक जीव गमावला.या घटनेनंतर बांधकाम विभाग विरोधात नागरिक रोष व्यक्त करत आहे.

संतोष राजपूत हे संग्रामपूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत संतोष राजपूत हे जळगावचे रहिवासी आहेत घटनास्थळी सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच संग्रामपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दोन्ही हजर होते पुढील तपास सोनाळा पोलीस करत आहेत.

Previous articleकळझोंडी गावचे माजी पोलीस पाटील चंद्रकांत पवार यांचे निधन
Next articleटाटा समूहाचे माजी अध्यक्ष उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here