Home रत्नागिरी कळझोंडी गावचे माजी पोलीस पाटील चंद्रकांत पवार यांचे निधन

कळझोंडी गावचे माजी पोलीस पाटील चंद्रकांत पवार यांचे निधन

272

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0030.jpg

कळझोंडी गावचे माजी पोलीस पाटील चंद्रकांत पवार यांचे निधन

रत्नागिरी,(सुनील धावडे)- तालुक्यातील कळझोंडी गावचे माजी पोलीस पाटील चंद्रकांत लक्ष्मण पवार यांचे २ सप्टेंबर रोजी निधन झाले. निधनासमयी ते ६१ वर्षाचे होते

चंद्रकांत पवार यांनी गेली अनेक वर्ष पोलीस पाटील म्हणून कळझोंडी गावात अतिशय चांगल्या प्रकारे उल्लेखनीय कामगिरी केली. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असत. पोलीस पाटील पदावरून ते गेले दोन वर्षांपूर्वीच नियत वयोमानानुसार निवृत्त झाले होते. ते अतिशय उत्साही , धाडसी आणि सुस्वभावी होते. सुख दुःखाच्या प्रसंगी ते अनेकांना मदतीचा हात देत असत. बौद्धजन पंचायत समिती गाव शाखेच्या सचिव पदावर त्यांनी अनेक वर्ष निष्ठेने आणि आवडीने काम केले होते.

दिवंगत चंद्रकांत पवार यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहीणी, मुली, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. चंद्रकांत पवार यांच्या निधनाबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत परिसरातील अनेक गावातील लोक सहभागी झाले होते.

त्यांचा जलदान विधी गुरुवार ८ सप्टेंबर रोजी कळझोंडी येथील राहत्या घरी होणार आहे.

Previous articleसंतोष माचकर यांनी गणेशोत्सवानिमित्ताने तयार केले कोकण रेल्वेचे चलचित्र
Next articleअर्धवट असलेल्या पुलांमध्ये पडल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू,बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.