Home रत्नागिरी संतोष माचकर यांनी गणेशोत्सवानिमित्ताने तयार केले कोकण रेल्वेचे चलचित्र

संतोष माचकर यांनी गणेशोत्सवानिमित्ताने तयार केले कोकण रेल्वेचे चलचित्र

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0031.jpg

संतोष माचकर यांनी गणेशोत्सवानिमित्ताने तयार केले कोकण रेल्वेचे चलचित्र

रत्नागिरी,(सुनील धावडे)- रत्नागिरी येथील औद्योगिक वसाहतीत राहणारे फर्निचर व्यवसायिक संतोष माचकर यांनी गणेशोत्सवानिमित्ताने तयार केलेल्या कोकण रेल्वेच्या चलचित्राने रत्नागिरीसह जिल्हाबाहेरील अनेकांना भुरळ घातली आहे. अत्यंत आकर्षक पद्धतीने हे चलचित्र संतोष माचकर यांनी तयार केले आहे. अनेकांनी हे चलचित्र पाहून उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संतोष माचकर यांनी प्रथम रत्नागिरीतील परटवणे येथील राहत्या घरी कोकण रेल्वेचे चलचित्र बनविले होते. गणेशोत्सव कालावधीत संतोष माचकर हे दरवर्षी चलचित्र बनवितात. गेली ३५ वर्षे ते हे काम करत आहेत.

फर्निचर व्यवसायानिमित्त संतोष माचकर हे सध्या एमआयडीसी येथे राहण्यास गेले. त्यामुळे यावर्षी याचठिकाणी त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. यावर्षी कोणता देखावा करायचा असा विषय पुढे आला. मुलांनी कोकण रेल्वेचे चलचित्र करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा हे चलचित्र बनविले. ते तयार करण्यासाठी १५ दिवस लागल्याचे संतोष माचकर यांनी सांगितले. रत्नागिरी येथील एमआयडीसीमधील प्लॉट नंबर सी-१९०, फिनोलेक्स कॉलेजमागे याठिकाणी संतोष माचकर राहतात.

Previous articleभाजपा अल्पसंख्यांक मोर्चा रत्नागिरी शहराध्यक्षपदी रफिक मुकादम यांची निवड
Next articleकळझोंडी गावचे माजी पोलीस पाटील चंद्रकांत पवार यांचे निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here